केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षनात केडीएमसीला २२ वे स्थान

प्रतिनिधी.

कल्याण – केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2020 मध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेला 22 वे स्थान प्राप्त झाले असून 2017 पासून आतापर्यत 234 व्या स्थानावरून 22 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.त्यामुळे स्वच्छ शहर सर्वेक्षणात कल्याण डोंबिवली महापालिकेवरील अस्वच्छतेचा कलंक पुसन्यात यश आले आहे . प्रशासनाने आता कचरा वर्गीकरणावर भर देण्यात आले असून पुढील वर्षी केडीएमसीला पहिल्या 10 मध्ये नक्की स्थान मिळेल असा विश्वास पालिकेचे घनकचरा विभागाचे उप आयुक्त रामदास कोकरे यांनी व्यक्त केला आहे.
देशभरातील तब्बल 4000 शहराचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत मागील चार वर्षापासून पालिकेला कायमच खालचे स्थान मिळत आले आहे. 2017 साली 234 वे, 2018 मध्ये 97 वे, 2019 मध्ये 77 वे स्थान मिळाले होते.तर यंदा मात्र केडीएमसीला 22 वे स्थान मिळाले आहे. मागील आकडेवारी पाहता यंदाचा निकाल दिलासा देणारा असला तरी यंदा पालिका प्रशासनाने कचरा वर्गीकरणवर विशेष भर दिला असून नागरिकाकडून चांगले सहकार्य मिळत असून कचरा वर्गीकरणा बरोबरच ओल्या कचर्यापासून बायोगस आणि वीज निर्मिती काम्पोस्तिग करत आहोत तर सुक्या कचर्याचे विक्री केली जात आहे. यामुळे 2021 च्या निकालावर आणखी चांगला परिणाम होईल असा विश्वास घनकचरा व्यवस्थपनाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी व्यक्त केला आहे. कचरा वर्गीकरनामुले  आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. बारावे घनकचरा प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यास महिना भराचा कालावधी लागणार आहे. यानंतर आधारवाडी डम्पिंगचा वापर पूर्णपणे बंद केला जाईल. नंतर या डम्पिंग वरील कचऱ्याचे बायो डिग्रीडेबल प्रक्रिया सुरु केली जाईल. दरम्यान नागरिकांनी कचरा वर्गीकरणाला सहकार्य करत सातत्य ठेवावे असे आवाहन कोकरे यांनी केले आहे.पालिका प्रशासनाचे प्रयत्न आणि नागरिकाचे सहकार्य या माध्यमातून वर्षभरात स्वच्छ शहराच्या यादीत पहिल्या 10 मध्ये पालिकेला नक्की स्थान मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web