केडीएमसीवर नागरी हक्क संघर्ष समिती व्दारे मोर्चा आंदोलन

प्रतिनिधी.

कल्याण – नागरी हक्क संघर्ष समिती वतीने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या क्षेत्रात कारोना महामारी विरोधात महापालिका गेट वर सर्व विरोध झुक्कारुन मोर्चा आंदोलन काळ सकाळी  करण्यात आले. महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या मनमानी कारभारामुळे आणि हलगर्जी पणा मुळे आजमितीस करोनाने ५०० लोकांचा बळी गेलेला आहे. असे नागरी हक्क समितीचे म्हणणे आहे, आम्ही गेले चार पाच महिने अनेक उपाय योजना करोना मुक्ती साठी सुचवल्या होत्या त्याची दखल आयुक्त महोदय यांनी घेतली नाही .याचा फटाका नागरिकांना बसला पोलिसांना बसला. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. शेवटी नागरी हक्क संघर्ष समितीला आणि सर्व् पक्ष कार्यकर्ते यांना मोर्चा आंदोलन करावे लागले . अनेक कार्यकर्ते यांनी बॅनर घोषणा बोर्ड घेऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून महापालिकेवर धडक दिली. सहाय्यक आयुक्त/वैद्यकीय अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार धोरणात्मक निर्णय असल्याने मी यावर काही करू शकत नाही. म्हणून बुधवारी दुपारी एक वाजता आयुक्त दालनात आयुक्त यांच्या बरोबर बैठक निश्चित करण्यात आली.

नागरी हक्क संघर्ष समितीच्या वतीने खालील विशेष मागण्या सादर करण्यात आल्या

सर्वांना मोफत कारोना उपचार मिळाला पाहिजे, खाजगी व सरकारी हॉस्पिटल मध्ये पूर्ण मोफत उपचार द्या, लोक आत्महत्या करीत आहेत. म्हणून मनोसोचार तज्ञ डॉक्टर कायम स्वरुपी नेमा.
तीस हजार लोकांन मागे एक स्मशान भूमी द्या.डिझेल/गॅस वरील विद्युत दहिनी तात्काळ सुरु करा. पर्यावरण वाचवा. रोज कोणत्या हॉस्पिटलला बेड किती उपलब्ध आहेत ते जाहीर करा.आणखी काही मागण्या आणि सूचना आहेत. त्यावर बुधवारी दुपारी एक वाजता आयुक्त यांचे बरोबर बैठक आहे.
बाबा रामटेके, डॉ गिरीश लटके, अण्णासाहेब रोकडे, इरफान शेख, काळू कोमासकर, राजा अक्केवर, नोवेल साळवे, श्रीकांत कांबळे, सैयद्द इजाज्, दादा कामले,अमित केरकर, अंकुश मुळीक, सचिन कुडेकर अशा अनेक कार्यकत्यांनी भर पावसात मोर्चा आंदोलन केले. सर्व कार्यकर्ते यांनी मिळून मोर्चा आंदोलन यशस्वी केले. महापालिका गेट वर मोर्चा अडवण्यात आला. तेथे कार्यकर्त्यांनी भाषणे करून, घोषणा देऊन प्रशासना विरोधात हल्ला बोल केला.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web