काकोळे धरणाच्या संरक्षण भिंतीला तडे,अंबरनाथ,उल्हासनगर ग्रामीण भागासाठी धोक्याची घंटा? प्रशासनाचे दुर्लक्ष

प्रतिनिधी.

अंबरनाथ – तालुक्यातील काकोळे गावाच्या हद्दीत असलेल्या ब्रिटिश कालीन धरणाच्या संरक्षण भिंतीला तडे गेले आहेत.सध्या या भिंती मधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने सध्या आजूबाजूच्या गावांसाठी हा धोक्याचा इशारा असू शकतो.

ब्रिटिश सरकारने कल्याण जवळच्या दुर्गम अश्या काकोळे गावातुन वाहणाऱ्या वालधुनी नदीवर धरण बांधले होते. लालूप्रसाद यादव यांनी याच धरणातील पाण्यावर रेलनीर प्रकल्प उभारून रेल्वेला कोट्यवधींचा फायदा करून दिला. या दिडशे वर्ष जुन्या धरणाच्या मोठ्या दगडी संरक्षण भिंतीला दोन वर्षांपूर्वी तडे गेले आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचे निष्काशन होत होते.स्थानिक ग्रामस्थांनी ही बाब तहसीलदारांपासून ते पंतप्रधानांन पर्यंत पोहचवली आहे.मात्र सध्या  कोणत्याही यंत्रणेने लक्ष दिले नसल्याने अंबरनाथ, उल्हासनगर आणि आजूबाजूच्या गावांना देखील ही संरक्षण भिंत धोक्याची घंटा देत आहे. या धरणाची संरक्षण भिंत ही मागील वर्षी देखील फुटली होती,मात्र ग्रामस्थांच्या सतरकर्तेमुळे भिंत बांधण्यात भर पावसात यश आले होते.मात्र यंदा पाणी गळतीचे प्रमाण अधिक असल्याने धोक्याची घंटा अधिक निर्माण झाली आहे.मागील वर्षी संरक्षण भिंत फुटल्यानंतर शासनाकडून तातडीने दखल घेण्यात आली होती. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या धरण क्षेत्राचा दौरा करून तातडीने डागडुजी करून संरक्षण भिंत नव्याने उभारण्याचे अश्वासन ग्रामस्थांना दिले होते.त्यावेळी जिथे भिंत फुटली तो भाग तात्पुरता दुरुस्त करण्यात आला.मात्र सम्पूर्ण भिंतीची डागडुजी झालीच नाही.आता या ग्रामस्थांना पुन्हा धोका या धरणाने निर्माण झाल्याचे ग्रामस्थ नरेेश गायकर यांनी सांगितले.आतातरी प्रशासन लक्ष देईल का हे पाहावे लागेल..

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web