बँड पथक,वाजंत्री व्यवसायातील लोकांनी आपला व्यवसाय सुरू व्हावा या संबंधी ऍड.बाळासाहेब आंबेडकरांची घेतली भेट

प्रतिनिधी.

मुंबई – बँड पथक/ ढोल ताशे वाजवायचा व्यवसाय हा सिजनल व्यवसाय आहे. उन्हाळ्यातील आणि दिवाळीतील लग्नसराई, गणपती, देवी या काळात मोठ्या प्रमाणावर धंदा असतो. गणपतीवेळी तर मुंबई, पुण्यात पूर्ण महाराष्ट्रातून बँड/ढोल ताशा पथके येतात एवढा धंदा या काळात असतो. पण लॉकडॉऊन मुळे या व्यवसायातील लोकांचा महत्वाचा सिजनच घरात बसून जात आहे.या व्यवसायातील लोकं अगदी सामान्य गरीब असलेली लोक आहेत. 4-5 महिने झाले काम बंद आहे अश्यात या लोकांनी आपले घर कसे चालवावे? सरकार कडुन कवडीचीही मदत लोकांना करण्यात येत नाही आहे तेंव्हा या लोकांनी जगायचे कसे?कोरोनाच्या नावावर लॉकडॉवून सरकारने आता थांबवावे..ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडी बँड/ढोल ताशे/ब्रास पथकांचा व्यवसाय सुरू करू द्यावा यासाठी ठामपणे या पथकांच्या सोबत आहे. सरकारने एकतर महिना दहा हजार रुपये द्यावेत अन्यथा लोकांना त्यांचे रोजगार सुरू करू द्यावेत. काल 17 ऑगस्ट रोजी बेस्ट, एसटीतील कर्मचाऱ्यांवर लॉकडॉऊनच्या नावावर अन्याय होत असल्याविषयी वीबीएची प्रेस कॉन्फरन्स होती. त्यावेळी वाजंत्री व्यवसायातील लोकांनी आपला व्यवसाय सुरू व्हावा या संबंधी ऍड.बाळासाहेब आंबेडकरांची भेट घेतली, लॉकडॉवून मुळे त्रस्त झालेल्या जनतेसाठी लढणारे एकमेव नेते ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत ही जनता आता एकवटत आहे.

वंचित बहुजन आघाडी चे सर्वेसर्वा मा. बाळासाहेब आंबेडकर साहेबांचे करोना सारख्या महामारीत झालेला लॉकडाऊन त्या मध्ये सरु झालेली उपासमार व बंद पडलेला बँड व्यावसाय कधी सुरु होईल माहित नाही . मुंबई / ठाणॆ ब्रास बँड संघटना चे पदाधिकारी यांनी आपल्या समस्या मा. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबासमोर मांडल्या त्यांनी बँड व्यावसायीकाच्या समस्या शासन दरबारी पोहचविण्याचे आश्वासन दिले .त्या बद्दल साहेबांचे सर्व बँड व्यावसायीका आभार मानले. त्यावेळी सोबत वंचित बहुजन आघाडी चे चेम्बुंर तालुक्याचे पदाधिकारी ही उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web