संजय राऊतांच्या वक्तव्याचा डोंबिवली भाजपकडून निषेध शिवसेना-भाजप मध्ये ‘कंपाउंडर वॉर

प्रतिनिधी.

डोंबिवली – संजय राऊत यांनी डॉक्टर आणि कंपाउंडर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा भाजपनं डोंबिवलीत पत्रकार परिषद घेत निषेध केला.राऊतांनी केलेलं वक्तव्य हे डॉक्टरांचं मानसिक खच्चीकरण करणारं असल्याचं भाजपनं म्हटलं.

भाजपनंही डोंबिवलीत पत्रकार परिषद घेत राऊतांच्या वक्तव्याचा निषेध केला. सध्या कोरोनाच्या काळात डॉक्टर्स जीव धोक्यात घालून आपल्यासाठी लढत असून अशात कौतुक करणं सोडून डॉक्टरांबद्दल असं वक्तव्य करणं, हे डॉक्टरांचं मानसिक खच्चीकरण करणारं असल्याचं मत भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी व्यक्त केलं. सोबतच कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे हे स्वतः डॉक्टर असल्यानं त्यांनीच याबाबत खुलासा करावा, अशी मागणी कांबळे यांनी केली.

तर खासदारांकडे मागणी करणारे कांबळे हे स्वतः डोंबिवलीचे भाजप आमदार रवींद्र चव्हाणांचे कंपाउंडर आहेत, त्यामुळे त्यांनी अशा मागण्या करू नये, अन्यथा त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा यानंतर शिवसेनेचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी दिला. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत शिवसेना भाजप ‘कंपाउंडर वॉर’ सुरू झाल्याचे दिसून आलेत.केडीएमसी मध्ये गेले अनेक वर्षे दोन्ही पक्ष सत्तेमध्ये असून सुद्धा विकास मात्र कुठेही दिसत नाही आहे,कल्याण-डोंबिवली परिस्थिती जैसे थे आहे.तरी सुद्धा सेना-भाजप मधील राजकारण संपताना दिसत नाही आहे

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web