जालना जिल्हा रुग्णालयात लिक्वीड ऑक्सिजन प्लॅन्टचा शुभारंभ

जालना जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या लिक्वीड ऑक्सिजन प्लॅन्टचा शुभारंभ आरोग्य मंत्री राजेश टोपे याच्या हस्ते करण्यात आला. महिकोचे प्रमुख श्री. बारवाले यांनी सी. एस. आर. फंडात दिलेल्या 50 लक्ष रुपयांच्या माध्यमातून 20 हजार लिटर क्षमता असलेल्या लिक्विड ऑक्सिजन प्लांटचा शुभारंभ करण्यात आला आहे.

रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना आवश्यक असलेल्या ऑक्सि्जनचा योग्य दाबाने व सुरळीतपाने पुरवठा या प्लांटमुळे होणार असून येणाऱ्या काळात राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयात अशाच प्रकारच्या प्लांटची उभारणी करण्यात येणार आहे.

यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधिक्षक एस. चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अधिकारी निमा अरोरा, उपविभागीय अधिकारी जालना संदीपान सानप,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, डॉ. संजय जगताप, डॉ. खंडागळे,संजय अग्रवाल यांची उपस्थिती होती.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web