स्वतंत्र दिना निमित्त डोंबिवलीत ११२ इमारतीत सँनीटाईझरची फवारणी

प्रतिनिधी.

डोंबिवली – गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि जैन धर्मियांचा पर्युषण पर्व सुरू झाले आहे यानिमित्ताने आणि स्वतंत्र दिनाच्या मुहूर्तावर भाजप आणि डोंबिवली पूर्वेतील किंग्ज ग्रुप कडून तब्बल 112 इमारतीत सँनीटाईझरची फवारणी करण्यात आली आहे.

डोंबिवली पूर्वेतील विविध भागात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे डोंबिवली पूर्वेतील किंग्स ग्रुप आणि भाजप मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी रघुवीरनगर आणि संगीतावाडी येथील इमारती सँनीटाईझरची मोहीम हाती घेतली होती. ३५ कार्यकर्त्यांनी सुरक्षात्मक उपाययोजना (पीपीई ) किट परिधान करून १८ मशिन्स यांच्या साहाय्याने तब्बल २१० विग्स, ११२ इमारती मध्ये सँनीटाईझरची फवारणी केली आहे.यामध्ये मंदिर आणि सार्वजनिक ठिकाणांचा देखील समावेश आहे.अशी माहिती भाजपा पूर्व मंडळाचे उपाध्यक्ष उमेश पाटील यांनी दिली आहे.या उपक्रमात भाजपाचे उमेश सदाशिव पाटील, सरचिटणीस उमेश साळवी, गुजराती आघाडीचे कल्याण जिल्हा अध्यक्ष मुकेश सिंघानी, वाँर्ड अध्यक्ष रौन शहा, राजा सिंघानी,अशोक दोषी,संगीता बावसकर, आरती आंबेकर आणि कार्यकर्ते या उपक्रमात उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web