पारंपारिक कावड यात्रा खंडित होऊ नये – ॲड बाळासाहेब आंबेडकर

प्रतिनिधी.

अकोला – सण, उत्सव आणि परंपरा या समाजजीवनाचा अविभाज्य घटक आहेत परंतु अलीकडे करोनाच्या नावावर सामाजिक सण व उत्सव कुलूपबंद करण्याचा केंद्र व राज्य सरकारचा प्रयत्न असुन अकोला जिल्ह्याचे मानाचे व पारंपारिक ईतिहासाचा वारसा असलेल्या कावड यात्रेला खंडित होऊ देणार नाही त्यासाठी प्रशासन व सरकार दोन्ही सोबत बोलून सुवर्णमध्य काढण्याचा विश्वास ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी राजराजेश्वर मंदिराच्या आवारात आयोजित कावडधारि मंडळाचे प्रमुख, शिवभक्त व राजराजेश्वर ट्रस्ट चे विश्वस्त यांच्या बैठकीत दिला.

राजराजेश्वर हे अकोल्याचे आराध्य दैवत असुन जिल्ह्यात कावड यात्रेला ऐतिहासिक वारसा आहे तो कायम रहावा. गेली काहि आठवडे प्रशासन कावडधारि, शिवभक्त मंडळास पारंपारिक कावड काढण्यावरुन वाद सुरु आहे. प्रशासन करोनाच्या नावाखाली उत्सव साजरा करण्यास आणि प्रामुख्याने मानाच्या पालख्या आणण्यास मज्जाव करित आहेत. जिल्हा प्रशासन व पालकमंत्री व पोलिस प्रशासन कावडधारि मंडळाचे पदाधिकारी यांचे बैठकीत काहीही तोडगा न निघाल्याने जिल्ह्यात असंतोष धुमसत होता त्यावर ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी पुढाकार घेऊन कावड मंडळ, राजराजेश्वर चे विश्वस्त, शिवभक्त व वंचित चे पदाधिकारी यांनी मंदिराच्या प्रांगणात समन्वय बैठक आयोजित केली होती. या बैठकीत अनेक विषयांवर सखोल चर्चा करुन कावड मंडळाचे प्रमुख तसेच वंचित चे काही पदाधिकारी यांची आज सायंकाळी बैठक नियोजित करण्यात आली त्या बैठकीतील आराखडा प्रशासनापुढे मांडला जाईल व कावड उत्सव आणि परंपरा खंडित होणार नाही असे वचन ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी दिले. 

यावेळी राजेश्वर संस्थांनचे विश्वास्थ ऍड रामेश्वर ठाकरे आणि गजानन घोंगे यांच्या हस्ते ॲड बाळासाहेब आंबेडकर यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी डॉ धैर्यवर्धन पुंडकर, राजेंद्र पातोडे, नगरसेविका ॲड धनश्री देव, सभापती पंजाबराव वढाळ, ज्ञानेश्वर सुलताने, सभापती आकाश शिरसाट,प्रसिद्धी प्रमुख सचिन शिराळे, डॉ प्रसन्नजीत गवई, गौतम गवई, राजराजेश्वर शिवभक्त मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत सावजी, उपाध्यक्ष मुन्नाभाउ उकर्डे, राजुभाउ बुंदेले, सुनिलभाउ गरड, विजय विज, वसंतराव सोनटक्के, दिलिप नायसे, सुरज चौबे, राजुभाऊ चव्हाण, प्रल्हाद पुरोहित, हरिश बुंदेले, शँकर टिकार जागेश्वर शिवभक्त मंडळ, जय हिंद चौक अकोला अध्यक्ष – गजानन रोकडे, जय भवानी शिवभक्त मंडळ हरिहरपेठ अध्यक्ष – राजू चव्हाण, दुरगेश्वर शिवभक्त मंडळ भवानी पेठ अध्यक्ष- गोपाळ नागपूरे, लक्ष्मीनारायण शिवभक्त मंडळ हरीष बुंदुले, जंगलेश्वर शिव भक्त मंडळ माता नगर अध्यक्ष – महेश शर्मा, मानकेश्वर शिव भक्त मंडळ शिव चरणपेठ वैभव गाडे, जगदंबा शिवभक्त मंडळचे आकाश मोरे, श्री ममलेश्वर शिवभक्त मंडळ, लोकमान्य नगर बाळापूर रोड जुने शहर अकोला पालखी क्रमांक 33 चे राहुल गुजर, संतोषी माता शिवभक्त मंडळ किल्ला चौकचे चेतन चांदुरकर, महाकाल मंडळ विजय नगरचे कमल खरारे, नेमनाथेश्वर शिवभक्त मंडळचे मामा मोदीराज, रामरामेश्वर शिवभक्त मंडळ सागर पाटील, रामरामेश्वर शिवभक्त मंडळ राम नगरचे सागर भारूका, नाग नागेश्वर शिवभक्त मंडळ नायगाव पालकी नंबर 20 जयदेव भोकरे गणेश बरडकर , ममलेश्वर शिवभक्त मंडळ यांच्या सोबतच पराग गवई, जिवन डिगे, राहुल अहिरे, राजकुमार दामोदर, गजानन गवई, सोमोश डिगे, हितेश जामनिक, महेंद्र डोंगरे, आकाश शिरसाट फेव, सागर शिरसाट , सागर खाडे, आकाश अहिरे, शुद्धोधन वानखडे, उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web