कल्याण – कोरोनाच्या टेस्टींग वाढविल्याने मृत्यू दर कमी झाला. तसेच सगळीचे कोविड क्वारंटाईन सेंटर, केअर सेंटर आणि रुग्णालये चांगल्या आरोग्य सुविधांयुक्त उभारल्याने कोरोना नियंत्रणात येत असला तरी तो झिरो झाला पाहिजे या साठी मिशन झिरो कोविड मोहिमेचे पालकमंत्र्यांच्या हस्ते गुरुवारी दुपारी शुभारंभ झाला .
विरोधकाच्या टिकेला प्रतिउत्तर देताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोनाच्या संकट काळात अशा प्रकारचे राजकारण कोणीही करु नये. अशा प्रकारचे राजकारण करण्याची आवश्यकता नाही. सगळ्य़ांनी एकत्रित येऊन काम करु असा सल्ला विरोधकांना पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.
कल्याण पश्चिमेतील आधारवाडी स्पोर्ट कॉप्लेक्स येथे एमसीएचआय क्रेडीया संघटनेच्या वतीने मिशन ङिारो कोविड केसेस या मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आाला. याप्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, महापौर विनिता राणो, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, एमसीएचआयचे अध्यक्ष श्रीकांत शितोळे, पदाधिकारी रवी पाटील, मनोज राय, राजन बांदेलकर आदी मान्यवर उपस्थित होते