डोंबिवली – देवाच्या कामासाठी सीएल सिरीयल नंबर असलेल्या नोटा पाहिजेत असल्याचे सांगून दोन भामट्यांनी एका दुकानात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची 39 हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी अनोळखी विरोधात टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मानपाडा रोडवर असलेल्या प्रीमियम पेटस दुकानात शुभांगी जाधव या नेहमीप्रमाणे काम करत होत्या. बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास 45 ते 50 वयोगटातील एक व्यक्ती दुकानाच्या काउंटरवर येऊन थांबली. त्यांनी जाधव यांच्या हातात पाचशेची नोट देऊन सांगितले की, देवाच्या कामासाठी सीएल सिरियलच्या नोटा पाहिजेत. काऊंटरमध्ये असलेल्या नोटा तपासल्या. मात्र, त्यात सीएल सिरीयलनंबरची नोट नव्हती. त्याचवेळेस दुकानात अंदाजे पंचवीस वर्षाचा तरुण मुलगा आला. त्याने दुकानात पहिल्या आलेल्या व्यक्तीला विचारणा केली. त्याने सांगितले की की मला देवाच्या कामासाठी सीएल सिरीयलचा नोटा हव्या आहेत. मात्र या मॅडम देत नाहीत, तरुणाने दुकानातील महिलेला विनंती केली की त्यांना देवाच्या कामासाठी नोट हवी आहे तुमच्याकडे असेल तर द्या. काऊंटरमध्ये चाळीस हजाराचा एक बंडल होता. त्या बंडलमध्ये सिरीयल नंबरच्या नोटा असतील म्हणून त्यांना तो बंडल चेक करायला लावला. त्यानंतर त्यांना बोलण्यात गुंतवून एकाने हात चलाखीने त्या बंडलमधील 39 हजार रुपये लंपास केले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून टिळकनगर पोलीस फरार भामट्यांचा शोध घेत आहेत.