प्रतिनिधी.
कल्याण – कल्याण पश्चिमेतील बोरगावकर गल्ली शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास हत्या झालेल्या मटका किंग जिग्नेश ठक्कर च्या मारेकऱ्याला अवघ्या तीन दिवसात गुजरात येथून अटक करण्यात ठाणे खंडणी विरोधी पथकाला यश आले आहे. त्यानंतर मुख्य आरोपी धर्मेश उर्फ नन्नू शाह ला गुजरात मधून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे पोलीस चकमकीत ठार करतील या भीतीने नन्नू शाह गुजरात मध्ये पळाला असल्याचे समोर येत होते.
मटका किंग जिग्नेश ठक्कर याच्या हत्येप्रकरणी सोमवारी ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने जयपाल दुलगज उर्फ जपान या शुटरला अहमदाबाद (गुजरात) येथून ताब्यात घेतले. त्याच्याविरोधातील पुढील कारवाईसाठी पथकाने त्याला महात्मा फुले पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. जिग्नेश ठक्करची शुक्रवारी रात्री कल्याण रेल्वे स्थानक परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
काम आटोपुन कार्यालयातून घरी जाताना हल्लेखोरांनी जिग्नेश ठक्करवर पाच गोळ्या झाडल्या होत्या. जिग्नेश याचे ठाणे, कल्याण आणि उल्हासनगर भागात अनेक पत्त्यांचे क्लब असून तो क्रिकेटवर लावण्यात येणाऱ्या सट्टा बाजारात बुकी म्हणून देखील काम करीत होता. त्याचा बालपणीचा मित्र धर्मेश उर्फ ननू शहा हा त्यास या धंद्यात साथ देत होता. गुंड प्रवृत्तीच्या धर्मेश याचे धंद्यातील पैशावरून जिग्नेश सोबत काही दिवसांपूर्वी वाद झाला अन् येथूनच दोघा मित्रांमध्ये कट्टर दुष्मनीस सुरुवात झाली. धर्मेश याचा मित्र चेतन पटेल व जिग्नेश मध्ये २९जुलै रोजी वाद झाला व तो हाणामारीपर्यन्त पोहचला. याचवेळी धर्मेश याने जिग्नेश याचा काटा काढायचे ठरवले. आपला दबदबा रहावा यासाठी धर्मेशने जिग्नेश यास ठार करण्याचा कट रचला. त्यानुसार धर्मेशने जयपाल व इतर दोघा तिघा साथीदारांची मदत घेत शुक्रवारी रात्री कल्याण स्टेशन जवळच्या सुयश प्लाझा बिल्डिंग कम्पाउंड मध्ये जिग्नेशवर पाच गोळ्या झाडून त्याची निर्घृण हत्या केली.
या हत्येचा मुख्य आरोपी नन्नू शाह या बुधवारी ता .१२ रोजी गुजरात मधून मुसक्या आवळण्यात आल्या आहेत . ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने मोठ्या शिताफीने अटक केली आहे . कल्याण मध्ये मध्यवर्ती भागात गोळी बार करून नागरिकांत दहशत माजवली होती.दरम्यान या प्रकरणावरून समांतर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या आणि खंडणी विरोधी पथका दिले असल्याची बोलले जात आहे .