१८ गावांतील विकासकामे थांबवा केडीएमसी आयुक्त यांचा आदेश, मा.नगरसेवकाने फोडले आयुक्तांवर खापर

प्रतिनिधी.

कल्याण – केडीएमसीतील वगळलेल्या १८ गावांमधील १३ नगरसेवकांचे पद रद्द झाले असतानाच आता त्या गावांमध्ये महापालिकेच्या निधीतून सुरू असलेली अथवा प्रस्तावित असलेली कामे थांबविण्याचे आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विभागप्रमुखांना दिले आहेत. या आदेशामुळे गावांमध्ये प्रामुख्याने अमृत योजनेंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठ्याच्या कामांना तसेच रस्ते दुरुस्तीच्या कामांना फटका बसण्याची दाट शक्यता आहे.तर त्या गावातील पद रद्द केलेले नगरसेवक (माजी नगरसेवक) भाजपचे मोरेश्वर भोईर यांनी याला विरोध करत आयुक्तांवर खापर फोडत या निर्णया विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

केडीएमसीतील २७ गावांमधील १८ गावे राज्य सरकारने वगळली आहेत. त्यात घेसर, हेदुटणे, उंब्रोली, भाल, द्वारली, माणोरे, वसार, आशेळे, नांदिवलीतर्फे अंबरनाथ, आडिवली-ढोकळी, दावडी, चिंचपाडा, पिसवली, गोळीवली, माणगाव, निळजे, सोनारपाडा, कोळे ही गावे आहेत. १८ गावे वगळण्याबाबत राज्य सरकारने अधिसूचना काढल्यानंतर आयुक्त सूर्यवंशी यांनी तेथील नगरसेवकांचे महापालिकेतील सदस्यत्व रद्द केले आहे. दरम्यान, १८ वगळण्यात आल्याने या गावांमध्ये महापालिका निधीतून सुरू असलेली अथवा प्रस्तावित असलेली कामे थांबविण्यात येत आहेत. या आदेशाची सर्व विभागप्रमुखांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. तर दुुसरीकडे २७ गावांमध्ये प्रामुख्याने अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेची कामे सुरू आहेत. २७ गावांचा भाग असलेल्या १८ गावांमध्येही पाणीपुरवठा वितरण आणि संकलनाची कामे सुरू आहेत. या कामांसाठी राज्य सरकारने निधी दिला असलातरी काही निधीचा हिस्सा हा महापालिकेचा देखील आहे. त्यामुळे या कामांना खोडा बसण्याची शक्यता आहे आणि इतर विकास होणार नसल्याने तेथील पद रद्द केलेले नगरसेवक नाराज आहेत.त्या गावातील पद रद्द केलेले नगरसेवक (माजी नगरसेवक) भाजपचे मोरेश्वर भोईर यांनी आयुक्तांवर खापर फोडत सुपारी घेतली असा आरोप केला.तर याला उत्तर देत आयुक्तांनी सांगितले की शासनाने निर्णय घेतला आहे.माझे काम आहे शासनाने घेतलेल्या निर्णयाचे पालन करणे. त्याच निर्णयाचे पालन मी करत आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web