मनसे आ.राजू पाटील यांनी घेतली एमआयडीसी,केडीएमसी आणि पिडब्लूडीच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक

प्रतिनिधी.

डोंबिवली – गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना डोंबिवली मधील खड्डे हे जीवघेणें ठरत आहेत.त्यामुळे मनसे आमदार राजू पाटील यांनी केडीएमसी आणि एमआयडीसी आणि पिडब्लूच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली आहे. त्यामुळे आता डोंबिवली निवासी भागातील कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात असलेल्या गावान मधील खड्डे बुजवले जाणार आहेत.त्यामुळे ग्रामीण भागासह डोंबिवली निवासीभागातील नागरिकांची आठवडाभरात खड्यातून मुक्तता होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले आहे.

डोंबिवली निवासी भागात तसेच आजूबाजूच्या गावांमध्ये खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गणेशोत्सव हा काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने नागरिकांना खड्ड्यांचा त्रास होणार आहे.त्यामुळे यंदा ग्रामीण भागासह डोंबिवली निवासी भागातील खड्डे तातडीने बुजवण्याच्या सूचना आमदार राजू पाटील यांनी केल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात रस्त्यावरील खड्डे बुजवले जाणार आहे.डोंबिवली मधील एमआयडीसी कार्यालयात झालेल्या बैठकीत गणेशोत्सवाधी खड्डे बुजवले जाणार असल्याचे आश्वासन आमदार राजू पाटील यांना अधिकाऱ्यांनी दिले आहेत. या बैठकीला एमआयडीसीचे के.एस.भांगरे डोंबिवली एमआयडीसी अधीक्षक, एस.एस.ननावरे कार्यकारी अभियंता, एस.के.कळसकर उप अभियंता तर केडीएमसीचे जगदीश कोरे कार्यकारी अभियंता, किरण वाघमारे उप अभियंता, राजेश वसईकर कनिष्ठ अभियंता पिडब्लूडीचे प्रितेश पराळे ,श्री चव्हाण , यांच्या सह मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर,कल्याण ग्रामीण विधानसभा अध्यक्ष मनोज घरत यांच्यासह महाराष्ट्र सैनिक बैठकीला उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web