माणकोली पूलाचे काम १५ महिन्यात पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार- खा.डॉ.श्रीकांत शिंदे

प्रतिनिधी.

डोंबिवली – कल्याण डोंबिवली शहरांमधील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी डोंबिवली पश्चिमेतील मोठागांव ते भिवंडीतील माणकोली पर्यंतच्या महत्वाकांक्षी पुलाला एमएमआरडीएच्या कार्यकारी समितीने 2013 साली मंजुरी दिली होती.एमएमआरडीएकडून  मोठागांव येथील खाडीवर  2016 च्या एप्रिल महिन्यात या पुलाचे काम  सुरू करण्यात आले आहे. या पुलाचे काम एप्रिल 2021 पर्यँत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते  .या पुलाच्या कामाचा आढावा आज खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतला यावेळी एमएमआरडीएचे अधिकारी ,पालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी ,महापौर विनिता राणे ,नगरसेवक दीपेश म्हात्रे आदी उपस्थित होते .यावेळी खासदात शिंदे यांनी कामात येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या तसेच अधिकार्यांनी कामाबाबतचा लेखा जोखा मांडला.यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी पुलाच्या कामाची पाहणी केली मोठागव समोरील बाजूस बोटीने प्रवास करत त्याबाजूच्या पुलाच्या कामाची देखील पाहणी केली. पुलाची भूसंदनाची प्रक्रिया 80 टक्के पूर्ण झाली असून उर्वरित प्रक्रिया देखील सुरू आहे.१५ महिन्यात पुलाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असे सांगितले. तर पुलाला जोडणाऱ्या रिंग रूटचे काम ही एकाच वेळी पूर्ण करून ही दोन्ही कामे मार्गी लावण्याचे प्रयत्न करणार असे सांगितले.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web