डोंबिवली – बेळगाव जिल्ह्य़ातील मनगुत्तीमध्ये कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शुक्रवारी रात्री हटवला. त्याचे पडसाद कर्नाटक बरोबर महाराष्ट्रातही उमटले आहेत.डोंबिवली , कल्याण , कल्याण ग्रामीण भागातील १४ गावांमध्ये शिवसैनिकांनी या घटनेचा निषेध केला आहे.
डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती येथे , कल्याण पश्चिमेला महाराज्यांच्या पुतळा आणि कल्याण तालुका शिवसेनेच्या वतीने दहिसर येथील शिवसेना कार्यालयासमोर निषेध करण्यात आला. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करत त्याचे दहन करून निषेध करण्यात आला.
