प्रतिनिधी.
कल्याण – बेळगाव जिल्ह्यातील निपाणी जवळ असलेल्या मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला. अश्वारूढ पुतळा काढण्यात आल्याने मराठी भाषिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण मधील शिवसैनिकांनी कल्याण शिवाजी चौक सकाळी रविवारी ता. ०९ येथे कर्नाटक सरकार विरोधात घोषणा बाजी करत निषेध व्यक्त केला .कर्नाटक मधील भाजप सरकार मराठी द्वेष्टे आहेत भाजपने छत्रपतीच्या नावाखाली मतं मागितली आणि आता असे कृत्य करतात कर्नाटक सरकारचा निषेध करतो त्यांनी तत्काळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा बसवावा अन्यथा वेळप्रसंगीआम्हाला पक्षाकडून आदेश आल्यास तिथे जाऊन आंदोलन करू असा इशारा दिला
दरम्यान रवींद्र कपोते ( कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्र संघटक शिवसेना)माजीमहापौर राजेंद्र देवळेकर , नगरसेवक सचिन बासरे, विजय पोटे प्रकाश पेणकर महेश गायकवाड वंडार कारभारी , आणि शेकडो शिव सैनिक उपस्थित होते