ओबीसींच्या हक्कांच्या संपूर्ण आरक्षणची अंमलबजावणी करण्यासाठी वंबआ कडून निवेदन

संघर्ष गांगुर्डे 

कल्याण – देशामध्ये ओबीसी समाजाला मंडल आयोगानुसार २७ टक्के आरक्षण मिळाले आहे.मात्र देशातील बिजेपी सरकार आरक्षणाची अंमलबजावणी न करता ओबीसीचा हक्क हिरावुन घेत आहे.याबाबत आम्ही केंद्र सरकारचा जाहीर निषेध करतो.२०१६ पासुन मेडिकलच्या पदव्युत्तर स्तरातील अभ्यास क्रमामध्ये ओबीसीना आरक्षण नाकारुन ते खुल्या प्रवर्गाला दिले आहे.महाराष्ट्रात तरी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. याकामी मागास ओबीसीचा सर्वांगीण विकास साधणेसाठी मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार आपल्या महाराष्ट्रात शिक्षणात त्यांचे आरक्षण अबाधित ठेवावे अशी निवेदनाद्वारे वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी,सम्यक विद्यार्थी आंदोलन तर्फे निवेदन दिनांक ७/०८/२० रोजी देण्यात आले.यावेळी मायाताई कांबळे – वंचित बहुजन महिला आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्ष, मिलिंद साळवे- जिल्हा संघटक, रेखाताई कुरवारे -सचिव , विवेक थोरात-जिल्हा संघटक, गणेश शिंदे-कल्याण उपाध्यक्ष, सुरेंद्र ठोके- मा.डो शहराध्यक्ष, गौतम गवई- मा.डो.(प) शहराध्यक्ष, निलेश कांबळे- वंबाआ सदस्य, देवानंद कांबळे-वंचित सदस्य, प्रफुल्ल साळवे -उपाध्यक्ष, नितीन वानखेडे-शिवाजी नगर अध्यक्ष व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web