दहीहंडी उत्सवावर कोरोनाचे सावट कुंभारवाड्यातील मडके व्यावसायिक चिंतातुर

प्रतिनिधी.

कल्याण – कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग खूप बंधनकारक आहे. गर्दी टाळण्याचे आवाहन वारंवार राज्य आणि केंद्र सरकारकडून केले जात आहे. परिणामी या कोरोनाचा फटका सणांना बसला आहे. सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून या कोरोनाचे आलेले संकट लक्षात घेता गणेशोत्सवा पाठोपाठच दहीहंडी उत्सव रद्द होण्याची दाट शक्यता असल्याने दहहंडीसाठी लागणारी मडकी बनविणारी कुंभार मंडळीही चिंतातूर झाली आहेत.     

यंदा देशात कोरोनाचे सावट असल्याने लोकांनी एकत्र येणे कठीण झाले आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सद्या तरी कोरोनावर कोणती लस विकसित झाली नसल्यामुळे सोशल डिस्टंसिंग हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे कोरोचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केले. तथापी अर्थव्यवस्था ढासळल्यामुळे लॉकडाऊन शिथिल करत हळूहळू गोष्टी पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न होत आहे. असे असले तरीही कोरोनाचा धोका अजून कमी झालेला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात आणखी काळजी घेण्याची गरज आहे. त्यातच श्रावण महिन्यात लागोपाठ विवीध सण सुरू झाले असले तरीही कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना यंदा सणांवरही कोरोनाचे सावट आले आहे. दहीहंडी सणावर देखील कोरोना सावट असून कल्याण-डोंबिवलीसह आसपासच्या भागातील मानाच्या दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा राज्यावर करोनाचे संकट असल्याने सर्वधर्मीयांनी सण-उत्सवाला उत्सवी रुप देणे टाळले आहे. तर कोरोनाचे संकट पाहता लोकांची गर्दी टाळण्यासाठी बहुतांश ठिकाणचे दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आल्याने हंडीसाठी लागणारे मातीचे मडके बनवणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीचे संकट घोंगावत आहे. दहीहंडी उत्सवात लागणाऱ्या मडक्यांसाठी कल्याणच्या कुंभरवाड्यात एकच लगबग असते. मडके बनवण्यासाठी कारागिरांची लगबग सुरू असते. एका दुकानातून सुमारे पाचशे ते सातशे मडके या दिवसांत विकले जातात. मात्र यंदा आतापर्यंत अवघ्या 50 मटक्यांची ऑर्डर आल्याचे येथील माठ-मडके व्यवसायिकांनी सांगितले.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web