मनसे आमदार प्रमोद(राजू )पाटील यांच्याकडून अंबरनाथ मधील कोविड सेंटरला पिपीई किटचे वाटप

प्रतिनिधी.

अंबरनाथ – कोरोनाच्या या भयंकर काळात  संकटाचा सामना करण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या कोविड सेंटरमधील कर्मचाऱ्यांसाठी मनसेने सुरक्षा साधनांचे वाटप केले आहे. मनसेचे नेते कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांच्या माध्यमातून कल्याण, उल्हासनगर आणि अंबरनाथ परिसरात असलेल्या सर्व सरकारी कोविड सेंटरमधील कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका यांच्यासाठी पीपीई किटचे वाटप करण्यात आले आहे.याचच एक भाग म्हणून अंबरनाथ मधील डेंटल कॉलेजमध्ये सुरू असलेल्या कोविड सेंटरसाठी २५ बॉक्स पीपीई किट देण्यात आले. अंबरनाथमधील मनसेचे शहराध्यक्ष कुणाल सुभाष भोईर मनविसे शहराध्यक्ष धनंजय गुरव, जपेष भोईर यांनी सदरचे साहित्य अंबरनाथ पालिकेचे मुख्यधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्याकडे सुपूर्द केले.दरम्यान मुख्याधिकाऱ्यांनी आमदार राजू पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांचे आभार मानले….

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web