प्रतिनिधी.
डोंबिवली – ०३ ॲागस्ट २०२० रोजी डोंबिवली MIDC मधील फेज ०२ मधील अंबर केमिकल कंपनीत प्रचंड मोठा स्फोट झाला. सुदैवाने रक्षाबंधनाची सुट्टी असल्याने कोणतीही जिवितहानी झाली नाही. परंतु आजुबाजुच्या परीसरातील सर्व इमारतींना भुकंप झाल्यासारखा स्फोटाचे हादरे आणि धक्के जाणवले.आता याबाबत कल्याण ग्रामीण मनसे अध्यक्ष मनोज घरत यांनी मुख्यमंत्री आणि पर्यावरणमंत्री यांना पत्र लिहीत ट्विट केले आहे.
कल्याण ग्रामीण मनसे अध्यक्ष मनोज घरत यांनी पत्रात म्हंटले आहे की प्रोबेस कंपनी स्फोट,मेट्रोपाॅलिटीन एक्झीमकेम कंपनीचा स्फोट व आता हा स्फोट.डोंबिवली मधील स्फोटांची ही दुर्दैवी मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. त्यात कधी हिरवा पाऊस तर कधी गुलाबी रस्ते. जोडीला केमीकलचा उग्र दर्प तर पाचवीलाच पुजलेला.हे आम्ही डोंबिवलीकरांनी अजुन किती काळ आणि का म्हणून सहन करायचे ??? प्रोबेस स्फोटानंतर ज्या मालमत्तांचे नुकसान झाले त्या बाधीतग्रस्तांना सरकारने पंचनामे करुन आश्वासन देऊनही अद्याप त्याची नुकसानभरपाई देखील मिळालेली नाही.गुलाबी रस्त्याच्या घटने वेळी मुख्यमंत्री यांनी परीसराला भेट दिली होती. त्यानंतर धोकादायक कंपन्या हटवणार व अतिधोकादायक ०५ कंपन्या तात्काळ बंद करणार अशी आश्वासने देऊनही आजही सदरच्या कंपन्या राजरोसपणे व्यवसाय करत आहेत व डोंबिवलीकरांच्या जिवाशी खेळत आहेत.या कंपन्यांवर वचक ठेवण्याकरीता असलेल्या MIDC व MPCB या प्राधिकरणाकडे पत्रव्यवहार करुन करून डोंबिवलीकर जनताही आता कंटाळली आहे. या दोन्ही मंडळाकडील अधिकारी वर्ग फक्त नावाला उरला असुन भ्रष्टाचारामध्ये पुर्णपणे बुडाला असल्याने डोंबिवलीकरांच्या या जिव्हाळ्याच्या विषयाकडे त्यांचे पुर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास येत आहे.
विशेष म्हणजे मनसे कल्याण ग्रामीण अध्यक्ष यांनी आपल्या पात्रात सवाल करीत म्हंटले की डोंबिवली ही सुशिक्षितांची नगरी महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी… डोंबिवलीचे जावई या नात्याने डोंबिवलीची हीच ओळख ठेवायची की स्फोटांची व प्रदुषणाची डोंबिवली ही नवी ओळख रुढ करायची हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणुन सध्या तरी तुमच्या हातात आहे.सदर विषय अतिशय गंभीर असुन डोंबिवलीचा भोपाळ होऊ नये यासाठी तुम्ही तात्काळ यात लक्ष घालुन लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी ही नम्र विनंती सुद्धा केली आहे.

