युपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातील ९० हून अधिक उमेदवार यशस्वी

नवी दिल्‍ली – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशातील एकूण  829 यशस्वी उमेदवारांपैकी महाराष्ट्रातील 90 हून अधिक उमदेवारांनी यश संपादन केले आहे. राज्यातून अभिषेक सराफ हा प्रथम तर नेहा भोसले दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशभरातील गुणानुक्रमानुसार  हे दोघे आठव्या आणि पंधराव्या स्थानावर आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा वर्ष 2019 च्या परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर झाला. या निकालात  पहिल्या 100 उमेदवारांमधे महाराष्ट्रातील 5 उमेदवारांचा समावेश आहे. यात गुणानुक्रमे 8 व्या स्थानावर अभिषेक सराफ, नेहा भोसले 15 व्या स्थानावर,मंदार पत्की 22 व्या स्थानावर, आशुतोष कुलकर्णी 44 व्या स्थानावर, योगेश पाटील 63 व्या स्थानावर, विशाल नरवाडे 91 व्या स्थानावर, आहेत. दिव्यांगामधून राज्यातील जयंत मंकले हे 143 व्या स्थानावर आहेत.

जयंत मंकलेंची अंधत्वावर मात : केंद्रीय लोकसेवा आयोगात 143 क्रमांक

पुण्याचा जयंत मंकले या दिव्यांग उमेदवाराने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वर्ष 2019 च्या परीक्षेत 143 वा क्रमांक मिळविला आहे. या आधी जयंतने 2018 मध्ये ही लोकसेवा आयोगाची परिक्षा दिली होती, त्यावेळी त्याचा क्रमांक 937 होता. यावेळी पुन्हा प्रयत्न करीत 143 वा क्रमांक मिळविला.

महाराष्ट्रातील महिला यशस्वी उमेदवार

यंदाच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकालात महाराष्ट्रातील 12 महिला उमेदवारांनी बाजी मारली आहे. या मध्ये नेहा भोसले यांना देशभरातील गुणांनुक्रमानुसार 15 वे स्थान मिळाले आहे तर महाराष्ट्रातून त्या पहिल्या ठरल्या आहेत. याशिवाय नेहा दिवाकर देसाई (137), अश्विनी तानाजी वाकडे (200), गौरी पुजारी (275), नेहा किरडक (383), डॉ.प्रणोती संजय संकपाल (501), अंकिता अरविंद वाकेकर (547), पुनम प्रकाशराव ठाकरे (641), प्रियंका कांबळे (670), प्रज्ञा खंडारे (719), अनन्या किर्ती (736).

अधिकृत निकाल व यशस्वी उमदेवारांची नांवे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.


Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web