मनसे आमदार राजू पाटील यांचा वतीने घरकाम करणाऱ्या महिलांना अन्नधान्याचे वाटप

प्रतिनिधी.

डोंबिवली – देश लॉकडाऊन झाल्यापासून आपल्या विविध सामाजिक कार्याने चर्चेत असलेले मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या कामाचा धडाका सुरूच ठेवला आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी अन्नधान्य, कोरोना योध्यांसाठी आरोग्य साहित्य तसेच विविध विषयावर आवाज उठवत पत्रव्यवहार,पाठपुरावा ते करत आहेत. त्याच्या पाठपुराव्याला काही प्रमाणात यश सुद्धा आले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एक सक्षम विरोधी पक्षासाठी मतदारांकडे मत मागितली होती. मात्र संपूर्ण महाराष्ट्रात मनसेचा एकमेव आमदार म्हणून कल्याण ग्रामीण विधानसभेतून प्रमोद(राजू)पाटील हे निवडून आले आहेत.मात्र निवडून आल्या पासून मनसे आमदार हे नागरिकांच्या समस्या आणि प्रश्न सोडवण्यात व्यस्त आहेत. संकटात नागरिकांना येणाऱ्या अडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी आमदार पाटील हे नेहमीच पुढाकार घेत आले. गेल्या ४ महिन्यापासून कोविड-१९ (कोरोना) ह्या रोगाने थैमान घातले आहे. अनेक जणांवर उपासमारीची वेळ आली.मात्र आमदार पाटील यांनी लोकांना वेळोवेळी जमेल ती मदत केली.त्यासाठी त्यांनी कधीच आपला हात हा आखडता घेतला नाही म्हणूनच ज्या महिलांना गेले ४ महिने हाताला काहीच काम नाही अशा घरकाम करणाऱ्या महिलांची अडचण समजुन त्यांच्यासाठी त्यांनी अन्नधान्याचे किट देणाचे ठरविले आणि पुढे त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकता प्रतिष्ठान-पलावा यांचा सहकार्याने ज्यांच्याकडे ह्या महिला काम करत आहेत त्याच्याकडून ती नावे नोंदणीकृत करून घेण्यात आली आणि नंतर सोशल डिस्टन्सचे नियम पाळून अन्नधान्य वाटण्यास सुरवात केली आहे. नावे नोंदणी केलेल्या अश्या सहाशे पेक्षा जास्त महिलांना अन्नधान्य किट वापट करण्यात आले असे एकता प्रतिष्ठान-पलावा यांच्याकडून सांगण्यात आले.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web