प्रतिनिधी.
कल्याण – केडीएमसी मधून 18 गावे वगळ्या नंतर तेथील नगरसेवकांचे पद रद्द झाले आहे. यात नगरसेवक कुणाल पाटील यांचे पद सुद्धा रद्द झाले तरी कुठेही खचून न जाता त्यांनी आपले सामाजिक काम चालू ठेवले आहे.
देश लॉकडाऊन झाल्यापासून राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसह समाजातील सर्वच घटकांचे नुकसान झाले आहे. या मध्ये प्रामुख्याने आपल्या दैनंदिन जीवनात दररोज व्यायाम करणारे युवक देखील आहेत.मात्र या मध्ये व्यायाम करण्यासाठी असणाऱ्या व्यायामशाळा बंद असल्याने मालकांचे भाडे थकले आहेत.त्यामुळे सर्वसामान्य जनतेसह जिम मालकांचे देखील नुकसान झाले आहे. त्यामुळे तरुणांसह जिम मालकांना न्याय मिळवून देण्यासाठी नगरसेवक कुणाल पाटील यांनी मंत्री आदिती तटकरे यांच्यासह विधानसभा अध्यक्ष नाना पटोले ,उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची भेट घेऊन जिम मालकांच्या मागण्या शासन स्थरावर मांडल्या आहेत.
देश लॉकडाऊन झाल्या पासून राज्यातील जिम बंद आहेत. जिम बंद असल्याने मालकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे जिमच्या भाड्यात कपात करण्याची मागणी जिम मालकांनी केली होती. या संदर्भात जिम मालकांनी मा.नगरसेवक कुणाक पाटील यांची भेट घेतली होती. त्यानंतर तात्काळ कुणाल पाटील यांनी मंत्री आदिती तटकरे, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह विविध मान्यवरांची भेट घेतली आहे. युवकांनी भरलेल्या वार्षिक फि मध्ये त्यांना जिम सुरू झाल्यास ‘कॅरी ऑन’ करा असहि त्यांनी सागितले. यामध्ये जिम मालकांसह विद्यार्थ्यांना देखील मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे दिसून येत आहेत.जिम बंदअसल्यापासून कुणाल पाटील हे जिम सुरू करण्यासाठी शासन स्थरावर आग्रही होते.या साठी ते गेल्या अनेक महिन्यांपासून आग्रही होते.अखेर त्यांच्या मागणीला यश आले असून शासनाने दिलेल्या नियमानुसार उद्या पासून जिम सुरू होणार आहेत.