नारळी पौर्णिमा निमित्त कोरोना च्या प्रतिकात्मक प्रतिमेच विसर्जन

प्रतिनिधी.

कल्याण – श्रावण पौर्णिमेला कोळी बांधव नारळी पौर्णिमा असे म्हणतात. समुद्र हे वरूण देवाचे स्थान समजले जाते. या नारळीपौर्णिमेच्या दिवशी नारळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते.
परंतु या वर्षी अगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्यात आली.कोरोना विषाणूचा वाढता प्रार्दुभाव पाहता संपूर्ण शहर, जिल्हा,राज्य,देश जग कोरोनाच्या भीतीने त्रासून गेले आहे.घराघरात भीतीचे वातावरण झालेले दिसून येत आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान,बेरोजगारी,महामारी यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.अशा परिस्थितीत कोळी बांधवांनी नारळी पौर्णिमेचे निमित्त साधून सामाजिक अंतराचे भान ठेऊन सागर देवतेला व वरूण देवतेला नारळासोबत कोरोना विषाणूचे प्रतीक अर्पण केले. संपूर्ण जगावरील कोरोनाचे संकट दूर होऊ दे,या नैसर्गिक आपत्तीतुन लवकर सर्वांना मुक्त होऊ दे अशी प्रार्थना निसर्ग देवतेकडे या निमित्ताने करण्यात आली.
कोळी महासंघ राज्य उपनेते देवानंद भोईर , कल्याण भिवंडी अध्यक्ष अशोक मिरकुटे,कोळी महासंघ राज्य सचिव सुभाष कोळी, कोळी महासंघ ठाणे जिल्हाध्यक्ष सचिन कोळी, कोळी महासंघ कल्याण शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर भोईर आदी पदाधिकारी मान्य अर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छोटेखानी उत्सव साजरा केला आहे जास्त गर्दी मुळे कोरोना संसर्ग होऊ वाढुन पवित्र सणाला गालबोट लागू नये म्हणून साध्या पध्दीतीने कार्यक्रम केल्याचे ज्ञानेश्वर भोईर (कोळी महासंघ कल्याण शहर अध्यक्ष) यांनी सांगितले

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web