ग्रामीण व दुर्गम भागात सेवा देण्यासाठी बीएसएनएल कटीबद्ध

प्रतिनिधी.

अकोला – दुरसंचार क्षेत्रात प्रगती झाली असून त्यांचा लाभ अजूनही ग्रामीण जनतेला पाहिजे तसा पोहोचलेला नाही. बीएसएनएल ही शासकीय यंत्रणा ग्रामीण व दुर्गम भागात चांगली सुविधा देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन केन्द्रीय मानव संसाधन, दुरसंचार आणि इलेक्ट्रानिक्स,माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी केले. आज रविवार (दि.2) रोजी महाबिज येथे बीएसएनएलने भारत एअर फायबरव्दारे व्हाईस व डाटा या दोन्हीचा समाविष्ट असलेली सेवा सुरु केली त्यांच्या उद्घाटन प्रंसगी ते बोलत होते. यावेळी महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक अनिल भंडारी, बीएसएनएलचे प्रधान महाप्रबंधक सुनिल अग्रवाल, महाप्रबंधक पी.जी. पागृत, अकोल्याचे महाप्रबंधक पी.के.एस. बारापात्रे, उपप्रबंधक एच.एन.बागडे तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे महाराष्राथाचे बीएसएनएलचे महाप्रबंधक मनोजकुमार मिश्रा, बीएसएनएलचे निदेशक विवेक बंसल, विभागीय अभियंता विवेक मिश्रा, उपविभागीय अभियंता के.पी. वानखडे, ए.के. चुंगडे, पी.आर. ढोले यांची प्रमुख उपस्थिती होती. ना. धोत्रे पुढे म्हणाले की, भारत एअर फायबरव्दारे बीएसएनएलनी रेडिओ फ्रिक्वेंशी मार्फत व्हाईस व डाटा कमी खर्चात 35 कि.मी. पर्यंत अदान प्रदान केल्या जावू शकतो. सद्या अकोला जिल्ह्यात महाबीज हे बीएसएनएलचे ग्राहक असून येथे एमआयडीसी टेलिफोन एक्सचेंजवरुन एअर फायबरव्दारे व्हाईस आणि डाटा देण्यात आला आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील जनतेला कमी खर्चात शेवटच्या घटकापर्यंत सेवा देण्याचा बीएसएनएलचा मानस आहे. यासाठी बीएसएनएल जवळ एअर टॉवर उपलब्ध असून लवकरच देशात व्यापक प्रमाणात यासेवेव्दारे नेटवर्क देण्यात येईल. यामध्ये फायबर ऑपटीक्स केबलचा वापर करण्यात आलेला नसून रेडीओ फ्रिक्वेंशीव्दारे हवेतून डाटा आणि व्हाईस ट्रासफर करण्यात येत आहे. तूर्तास ही सेवा MIDC परिसरामध्ये सुरु करण्यात आली आहे तरी या सेवेचा लाभ MIDC पासुन ३ ते ४ की. मी. परिघातील लोकांना घेता येईल. भविष्यामध्ये ही सेवा लोकांच्या आवश्यकतेनुसार विस्तारित करण्यात येईल.

ही सेवा तूर्तास आरबीएसपी( Radio broadband service provider) अर्थात TIP ऑपरेटर मार्फत सुरु केलेली आहे. या सेवेमुळे स्वस्त दरात आणि कमी वेळे मध्ये उपलब्ध, सोपी आणि सुटसुटीत, ग्रामीण ग्राहकापर्यंत जेथे केबल उपलब्ध नाही अश्या ठिकाणी सेवा पुरवण्याची सुविधा व ग्रामीण भागामध्ये बीएसएनएलचे मनोरे मोठ्याप्रमाणात उपलबध असल्यामुळे याचा मोठ्या प्रमाणात विस्तार करणे शक्य असल्याचे अकोल्याचे महाप्रबंधक पी.के.एस. बारापात्रे प्रास्ताविकातून सांगितले. कार्यक्रमाचे संचालन उपविभागीय अभियंता ए.के. चुंगडे यांनी केले तर उपस्थिताचे आभार अकोला टेलिकॉम आणि नेटवर्क प्रा. लिमिटेडचे संजय जिरापूरे यांनी मानले.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web