प्रतिनिधी.
डोंबिवली – डोंबिवली शहरातील नागरिक येथील भावे सभागृह मधील सेतू सुविधा उपकेंद्रात शासकीय दाखले काढण्यासाठी मोठाप्रमाणात जात असतात. जवळ असल्या मुळे हे सेतू उपकेंद्र डोंबिवलीतील नागरिकांना सोयीचे आहे, पण मागील काही महिन्या पासून हे उपकेंद्र बंद असल्या कारण येथील लोकांची खूप गैरसोय होत आहे.
नुकताच बारावीचा निकाल लागला आहे त्याच बरोबर दहावीचा हि निकाल आता लवकरच लागणार आहे. अशा वेळी पुढच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला,अधिवास प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र या शासकीय दाखल्याची गरज लागते.मागील काही महिन्यान पासून भावे सभागृह, डोंबिवली(प.) येथील सेतूसुविधा उपकेंद्र बंद आहे . सेतू केंद्र बंद असल्यामुळे शासकीय दाखले काढण्यासाठी कल्याण तहसील या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे डोंबिवलीतील नागरिक आणि विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. त्याची खूप गैरसोय होते. त्यामुळे डोंबिवलीतील नागरिक आणि विद्यर्थी याची खूप फरफट होते. शिक्षणा साठी लागणारे महत्वाचे दाखले डोंबिवलीतील भावे सभागृहाच्या उपकेंद्रात मिळाले तर त्याची गैरसोय होणार नाही. नागरिक आणि विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी वंचित बहुजन आघाडी डोंबिवली शहर कमिटी तर्फे डोंबिवली येथील सेतू सुविधा केंद्र तातडीने सुरु करावे हि मागणी केली आहे. तसे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार कार्यालयात देण्यात आले नायब तहसीलदार श्री.सुषमा आव्हाड- बांगर यांनी ते निवेदन स्वीकारले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कल्याण जिल्हा संघटक मिलिंद साळवे यासंह बाजीराव माने, सुरेंद्र ठोके, राजू काकडे, नंदू पाईकराव, अर्जुन केदार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
