प्रतिनिधी.
डोंबिवली – महामारीच्या काळातही वैद्यकीय, स्वच्छताकर्मी, प्रशासन अनेक सेवाभावी समाजघटक आपापल्यापरीने या संकटाशी मुकाबला करत आहेतच.रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट ही तीस वर्षांची अनुभवी संस्था आपल्या कार्यात हिरीरीने अग्रेसर राहीली आहे.गेल्या महिन्यातच क्लबच्या मध्यस्थीने एका खासगी रुग्णालयाने शहरातील आपल्या दोन्ही वास्तूंचा उपयोग कोव्हिड १९ च्या रुग्णसेवेसाठी केला. गेले तीन महिने हा क्लब अनेक गरीब कुटुंबांसाठी किराणा-पाकिटे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मास्क आणि हॅन्डग्लोव्हज पुरवण्याचा प्रकल्पात पुढाकार घेत आहे. काही अंध कुटुंबांची अन्नधान्य पुरवून त्यांची नड भागवावी अशा विचारातून रविवार,दिनांक २६ जुलै रोजी एमआयडीसी परिसरातील ‘पोटोबा’ भाजीपोळी केंद्राजवळील रिक्षास्टँडजवळ सुमारे १२ अंध व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांना धान्य-पाकिटे देण्यात आली.या उपक्रमाचे प्रकल्प प्रमुख रो.मंदार कुलकर्णी, असून या प्रसंगी संस्थापक सदस्य डॉ.प्रल्हाद देशपांडे,इनरव्हील अध्यक्षा रो.ज्योती दाते, डिस्ट्रिक्ट पदाधिकारी रो.श्रीपाद कुलकर्णी आणि अनेक रोटेरियन्स उपस्थित होते.अंध गरजूंच्या वतीने रविंद्र सोनवणे यांनी क्लबच्या मदतीबद्दल आभार मानले.या प्रकल्पातील धान्य पॅकेट्सचे संयोजनभार रो.श्रीपाद कुलकर्णी आणि रो.दीपक काळे यांनी संयुक्तपणे उचलला होता