प्रतिनिधी.
कल्याण – चोरीच्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडीत असणााऱ्या २ कैदी असणाऱ्या आरोपींनी आधारवाडी जेलमधून पलायन केल्याचा प्रकार समोर ता .२७ सोमवारी पहाटे आला आहे. अविनाश गायकवाड आणि श्याम चव्हाण अशी या दोघा आरोपींची नावे आहेत.याच कारागृहातून काही महिन्यांपूर्वी ही केबल वायरच्या सहाय्याने कैदी पळून गेले होते . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कैदी पळाल्याची परिसरात खळबळ माजली आहे .
कल्याण पश्चिमेतील कारागृहात सुरक्षा बाबत अनेक त्रुटी आढळून आल्या आहे काही महिन्यांपूर्वी ही कैदी पळाल्याची घटना घडली होती त्यानंतर पोलिसांच्या अथक परिश्रमा नंतर अटक करण्यात आले होते . शाम चव्हाणवर भिवंडी, शांतीनगर आणि कोनगाव पोलीस ठाण्यामध्ये तर अविनाश गायकवाडवर कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आज(सोमवारी ) पहाटे पावणे पाचच्या सुमारास जेलमधील मुलाखत कक्षाच्या वरून चादरीच्या साहाय्याने उडी मारून या दोघांनी पलायन केल्याची प्रथमिक माहिती आहे.
दरम्यान कल्याण पश्चिमेतील खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून खडकपाडा पोलीस दोघांचाही शोध घेत असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक अशोक पवार यांनी दिली.