प्रतिनिधी.
भिवंडी– भिवंडी शहरातील खडन रोड, मानसरोवर येथील रेड लाईट भागात हनुमान टेकडी येथे लैंगिक कामगार म्हणून काम करणार्या महिलाचा लॉक-डाउन दरम्यान आपला व्यवसाय बंद पडला या जागतिक महामारीमुळे त्यांचे आयुष्य अंधकारमय झाले. त्यांच्या समोर उपासमार होती आणि दुसरीकडे कोरोना साथीची भीती होती. दरम्यान श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून श्री साई सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. साई स्वाती खान यांनी या महिलांना स्वावलंबी करण्याचा संकल्प केला आणि त्यांना घरगुती रोजगाराच्या प्रवाहात जोडत आत्मनिर्भर बनविले.त्यामुळे आज चार महिलांनी वेश्या व्यवसायाला समाजाच्या मुख्य प्रवाहात सोडले. आणि त्यांनी चागल्या आयुष्याला सुरुवात केली.
हनुमान टेकडी येथील सुमारे हजारो महिला वेश्या व्यवसायात गुंतल्या आहेत. डॉ. स्वाती खान या वेश्या महिलांच्या आरोग्यासाठी श्री साई सेवा संस्थानच्या अध्यक्षतेखाली सुमारे पाच वर्षे कार्यरत आहेत. डॉ. स्वाती खान यांनी विविध संस्थांच्या माध्यमातून या महिलांमध्ये तीन महिन्यांचे रेशन वाटप केले. दरम्यान, या महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी 25 महिलांना धूप-पॅकिंग आणि सजावटीच्या देशांतर्गत व्यवसायात प्रशिक्षण देऊन स्वावलंबनाचा धडा शिकविला गेला.या कामासाठी पैसे मिळू लागले तेव्हा या वसाहतीत राहनाऱ्या चार महिलांनी वेश्या व्यवसाय सोडून सामान्य स्त्रियांप्रमाणे जगण्याचा निर्णय घेतला. वसाहतीत वेश्या व्यवसाय करणार्या चार महिलांकडे वेश्यागृह सोडल्यानंतर डॉ. स्वाती खान यांनी त्यांना राहण्यासाठी भाडे घर उपलब्ध करुन दिले. आणि त्या घरांना मल्याळम भाषेत बहिणीचे घर “चीची हाऊस” असे नाव पडले. भिवंडी शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष कोकाटे यांच्या शुभहस्ते ‘चिची हाऊस’ च्या चाव्या या महिलांकडे देण्यात आल्या. श्री साई सेवा संस्थेचे अध्यक्ष असलेल्या डॉ. स्वाती खान यांनी या महिलांना आश्वासन दिले की त्याच प्रकारे रोजगार उपलब्ध करुन देण्यात येईल. जेणेकरून त्यांच्या आयुष्यात आवश्यक असलेली जीवन सामग्री पूर्ण होऊ शकेल. व त्याच बरोबर या महिला चागल्या प्रकारे आपले जीवन जगू शकतील.
डॉ. स्वाती खान म्हणाल्या या स्त्रियांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणल्यामुळे माझ्या मनाला आध्यात्मिक समाधान मिळते. यातील एक ३० वर्षीय महिला जवळपास 14 वर्षांपासून या नरकात राहत होती.आज चागल आयुष पुन्हा वाट्याला आल्या मुळे ती खूप खुश आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहात प्रवेश केल्यानंतर त्याच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले. रडणार्या महिला म्हणाल्या की आता आम्ही सर्वांनी सर्वांनी निश्चय केला आहे की आपण कोणत्याही समस्येचा सामना करू परंतु त्या नरकात पुन्हा जाणार नाही.जरआशा संस्था पुढे आल्या तर या वेश्या व्यवसायातील जास्तीत जास्त महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यास मदत होईल.

