प्रतिनिधी.
कल्याण – वनजीव प्राणीचा खेळ करणे एक तरुणाला महागात पडले आहे सापाचा खेळ करून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करणे अंगलट आले आहे. या प्रकरणी कल्याण वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत पुढील कारवाई वन निरीक्षक कल्पना वाघेरे करीत आहेत
प्राणी व वनजीव यांना बाळगणे, खेळ करणे , इजा पोहचवणे कायद्याने गुन्हा आहे असे असतांना डोबिवली पूर्वेतील राहणारा निरव गोगरी हा ४ वर्षांपासून सापांचा खेळ करीत असल्याचे तपासात उघड झाले आहे . त्याने सापाचा खेळ करीत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून जास्त व्हायरल झाल्याने निरव याच्या अंगलट आले आहे. महाराष्ट्र वनजीव प्रतिबंध कायदा १९७२ अन्वेय निरव दोषी ठरला आहे त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करून पुढील तपास वन निरीक्षक कल्पना वाघेरे करीत आहेत.
कल्याण डोंबिवली परिसरात वनजीव प्राणी यांच्या कोणी क्रूर कृत्य किंवा खेळ, तस्करी करीत असल्यास वन विभाग पोलीस ठाण्यात टोल फ्री क्रमांक १९२६ या दुरध्वनी वर तक्रार करू शकता.दरम्यान आरोपी निरव गोगरी ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे लॉक डाउन मध्ये पैसेची चणचण भासत असल्याने सापाचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून पैसे कमावण्याचा बेत होता मात्र हे कृत्य त्याच्या अंगलट आले आहे .