प्रतिनिधी.
कल्याण – खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहने एन.आर.सी.परिसरातील एका तबेल्यातील जर्सी गाय चोरी करून तिची हत्या ६ जून रोजी समोरच करण्यात आली होती त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे क्रूरतेचा कळस म्हणजे शरीरच्या प्रमुख अगांचे मांस कापण्यात आले आहे त्यानंतर खडक पाडा पोलिसांनी तपास सुरू केला होता मोठ्या शिताफीने भिवंडी आणि आंबिवली नेपच्यून मधून दोन चोरांना गजाआड केली आहे ही माहिती उपायुक्त विवेक पानसरे यांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी दुपारी दिली आहे.
आंबिवली पश्चिम भागातील मोहने एन. आर.सी परिसरात संतोष रामधनी सिंग यांचा गाय व म्हशींचा तबेला आहे. शनिवारी ता ०६ रोजी रात्री तीन अडीज वाजेच्या सुमारास गोठयातील जर्सी जातीची गाय चोरी करून समोरच तिची हत्या करून क्रूरतेचा कळस गाठला होता. अज्ञात व्यक्तींनी गायीच्या अंगावरील प्रमुख मांस कापून काही भाग तसाच ठेवून पोबारा केला त्यामुळे हा प्रकार वैमनस्यातुन किवा चोरीच्या उद्देशाने केला आहे की, समाजात तेढ निर्माण होण्यासाठी कृत्य केले आहे का? या दिशेने खडकपाडा पोलिसानी तपास सुरू केला होता. पोलिसांनी २२ आणि २३ जुलै रोजी दोन चोरांच्या मुसक्या आवळल्या १ ) आरोपी अफजल तस्लिम खान (३३) राहणार महाराणा किराणा दुकान जवळ माळा कॉलनी नदीनाका भिवंडी आणि ( २) कैस मूर्तझा डोन (३१) नेमॅच्युन सोसायटी बिल्डींग -२ रूम नंबर ५०४ आंबिवली कल्याण याना मोठ्या शिताफीने अटक करण्यात आली आहे. यांच्या मागावर पोलीस सहाय्यक अशोक पवार पोलीस निरीक्षक गुन्हे अंकुश बांगर डिटेकशन प्रमुख प्रीतम चौधरी, पोलीस कर्मचारी पवार , चन्ने यांनी खबरी व्दारे चोरांचा तपास लावला आणि त्यांना गजाआड करण्यात यश आले. तपास टीम अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती . पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी माहिती देताना सांगितले की आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम, ३७९ सह महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५,६,९, प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आणि आरोपीनी परिसरात असे किती गुन्हे केले आहे का याचा देखील तपास कसून करण्यात येणार असल्याची माहिती पानसरे यांनी दिली. दरम्यान कल्याण सत्र न्यायालयात दोन आरोपींना हजर करण्यात येणार आहे .
