प्रतिनिधी.
कल्याण – अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस तर्फे सफाई कामगारांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी धरणे निदर्शन आंदोलन करून शुक्रवारी ता.२४ सकाळी कल्याण तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टाक यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयसिंग कछुआ यांच्या नेतृत्वाखाली सफाई कामगाराच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी कल्याणच्या तहसीलदारांकडे मुख्यमंत्र्यांसाठी निवेदन देण्यात आले. कल्याण सफाई मजदूर कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्र अध्यक्ष प्रशांत गायकवाड यांच्या हस्ते तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी प्रसंगी ते म्हणाले पंधरा दिवसांत चर्चा करून मागण्या मान्य न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी जिल्हा सचिव मनोज गायकवाड, राहुल टाक, पुरुषोत्तम वढवाण, जगदीश घेगंट, चंद्रकांत वीर, जगदीश गायकवाड, शैलेश परमार, विजय आहेर उपस्थित होते.
दरम्यान क.डो.म.पा क्षेत्र अध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी प्रतिक्रिया देताना शासनाने आमच्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे अशी विनंती केली आली .
