कोविड योद्ध्यांना ३२ लाखाचे आरोग्य साहित्याचे होणार वाटप

डोंबिवली – मनसे नेते तथा आमदार प्रमोद ( राजू ) पाटील, रोटरी इंटरनॅशनल,रोटरी क्लब ऑफ क्राऊन सिटी, रोटरी क्लब ऑफ ठाणे आणि ठाणे वेस्ट यांच्यासह योगिराज कंपनी आणि डॉट मंट कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्यसेवा देणाऱ्या कोविड योद्ध्यांना आवश्यक अश्या वस्तूंचा पुरवठा आता केला जाणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्र,केडीएमसी,उल्हासनगर, अंबरनाथ क्षेत्रातील हॉस्पिटल, दवाखाने आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्यां कोविड योद्ध्यांना आवश्यक अश्या साहित्याचा पुरवठा केला जाणार आहे.यामध्ये ३००० कॉटन मास्क, ३००० एन ९५ मास्क, ५५०० पीपीई किट्स आणि हँड सॅनिटाईझर.वितरित करण्यात येणार आहेत.या साहित्याचे बाजार मूल्य हे ३२ लाख ५० हजार रुपये आहे.यासाठी रोटरी इंटरनॅशनची मोठी मदत मिळाली असून योगिराज,डॉट मंट या कंपन्यांनी आपले सीएसआर फंड देखील दिला आहे.हे साहित्य रोटरीच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यसेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱयांना दिले जाणार आहे. या उपक्रमात रोटरी क्लबचे मोहन चांदरकर,विक्रम कागदे,स्वप्नील गायकर, सूचित गडकरी, अच्युत दामले यांच्यासह विक्की रमेश पाटील यांनी विशेष सहकार्य केले. 

सदर वस्तूंची पाहणी करण्यात आली तसेच वाटपाचे नियोजन सुद्धा करण्यात आले.यावेळी रोटरीचे डॉ.मयुरेश वारके आणि इतर मेम्बर्स उपस्थित होते.तसेच मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम,जिल्हा संघटक हर्षद पाटील, सागर जेधे आणि उदय चेउलकर उपस्थित होते. आमदार राजू पाटील सर्व रोटरी क्लबचे आभार मानले आणि अजून नागरिकांनी, कंपन्यांनी या मदत कार्यात करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन केले आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web