कोरोना रुग्णाची आर्थिक लुट करणाऱ्या डॉक्टरांना राष्ट्र कल्याण पार्टीने विचारला जाब

डोंबिवली – संपूर्ण जगात कोरोना महामारीने माणसांना भयभीत केले आहे. भारत देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची आकडेवारी वाढत असल्याचे दिसते. महाराष्ट राज्यात रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे म्हणून पालिकेच्या रूग्णालयाबरोबर काही खाजगी रुग्णालये कोविड-१९ करण्यास शासनाने परवानगी दिली. पण रुग्णांचे दुर्देव आहे कि, त्यांना अश्या रुग्णालयात उपचाराचा खर्च न परवडणारा आहे.अश्या एका कल्याण येथील रुग्णालयात एका कोरोना रुग्णाला भरमसाठ बिले आकरण्यात आल्याने राष्ट्र कल्याण पार्टीने येथील डॉक्टरांना याचा जाब विचारला. नियमाप्रमाणे बिले न आकारल्यास धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर रूग्णालया व्यवस्थापनाने बिलाची रक्कम कमी केली.   

 कल्याण येथील एका कोविड-१९ च्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाला डिस्चार्ज दिल्यानंतर भरमसाठ बील आकरण्यात आले. रुग्णांची ऐपत एवढे बिलाची रकाम भरण्याची नसल्याने राष्ट्र कल्याण पार्टीकडे आपले म्हणणे मांडले. राष्ट्र कल्याण पार्टीचे राष्ट्र कल्याण पार्टीचे महासचिव राहुल काटकर, जिल्हाध्यक्ष हर्षद साळवी, शंभू यादव,प्रवीण के.सी., दुर्गेश मिश्रा,सुरज सिंग, संजय यादव व पदाधिकारी त्वरित सदर रुग्णालयात जाऊन या प्रकाराबाबत डॉक्टरांना जाब विचारला.नियमांचे पालन न करता रुग्णांना भरमसाठ बिले कोणत्या नियमाप्रमाणे लावण्यात आल्याबाबत राष्ट्र कल्याण पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टरांना विचारले.काही वेळ चर्चा झाल्यावर डॉक्टरांनी सदर रुग्णांची बिलाची कमी केली. दरम्यान राज्य सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देत कोरोना रुग्णांची रुग्णालयाकडून आर्थिक लुट होत असल्याचे सिद्ध झाल्यास अश्या  रुग्णालयावर कडक कारवाई करावी असे राष्ट्र कल्याण पार्टीची मागणी आहे.

Share via
  •  
  •  
  •  
  •  
  •  

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web