नागपूर – केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2020-21 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता महाराष्ट्र राज्यातून इंडियन इंस्टीट्यूट ऑफ हॅन्डलूम टेक्नॉलाजी, बरगढ (ओडिशा) करीता व 13 वेंकटगिरी करीता 2 जागेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यातकरीता प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर यांचेमार्फत विहित नमुन्यात 6 ऑगस्ट, 2020 पर्यंत प्रवेश अर्ज करण्यास मुद्दतवाढ देण्यात आली आहे.प्रवेश अर्जाचा नमुना व अधिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या www.dirtexmah.gov.in वेबसाईटवर उपलब्ध आहे. विदर्भातील पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा नमुना व अधिक माहितीकरिता प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, प्रशासकीय इमारत क्रमांक 2, आठवा माळा, सिव्हील लाईन्स, नागपूर. दूरध्वनी क्रमांक (0712) 2537927 वर संपर्क साधण्याचे आवाहन प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग स.ल. भोसले यांनी केले आहे