प्रतिनिधी
कल्याण – ठाणे व पालघर जिल्हा आशा व गट प्रवर्तक युनियन ,सिटू व्दारे केडीएमसी मुख्यालय बाहेर ता २१ मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आशा वर्कर्स विविध मागण्यांसाठी पालिका आयुक्तांना निवेदन दिले.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा वर्कर्स यांची भरती करण्यात आली अनेक आरोग्य विषयी कामे यांच्या मार्फत करण्यात येतात , कोरोना रुग्णाचा सर्व्हे करणे , गोळ्या औषधे पुरवणे ,नोंदी करणे , गर्भवती महिलांचे नोंदी त्याच बरोबर साथीच्या रोगात ही यांचे मोलाचे कार्य करतात त्यामुळे त्या मानाने मानधन अंत्यत कमी दिला जातो.
सिटू संघटने व्दारे आशा वर्कर्सना मानधन १० हजार रुपये देणे, कोरोनामध्ये ५० लाखाचा विमा कवच द्या, कोरोना लागण झाल्यास पालिका व्दारे मोफत उपचार करावेत अशा मागण्यासाठी संघटने व्दारे धरणे आंदोलन करण्यात आले. पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी याना मागणीचे निवेदन देऊन, मागण्या पूर्ण करण्यात याव्यात असे सघटने च्या वतीने सागण्यात आले. यावेळी शेकडो आशा वर्कस आणि संघटनेचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते
