केडीएमसी क्वारंटाईन सेंटर मधील दुर्दैवी घटना, इमारती मधून उडी मारून एकाचा मृत्यु

भिवंडी – भिवंडी येथील रांजणोली टाटा आमंत्रन कोव्हिड सेंटर मधील दुर्दैवी घटना केडीएमसी क्वारंटाईन सेंटर मधून एका कोरोना रुग्णाची इमारती वरून उडी मारली त्यात रुग्णाचा जागीच मृत्यू झाला. हि धक्कादायक घटना ता .१९ रविवारी ४ वाजेच्या सुमारास घडली. हे कोविड सेन्टर केडीएमसी प्रशासनाच्या अंतर्गत येते. या घटनेचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेने खाजगी रुग्णालयांना कोविड -१९ सेन्टर बनविण्यात आले आहेत त्यापैकी भिंवडी बायपास जवळ टाटा आमंत्रन या संकुला मध्ये कोविड रुग्णान साठी क्वारंटाईन सेंटर बनविण्यात आले आहे. केडीएमसी क्षेत्रातील कोरोना प्रादुर्भाव असणारे रुग्ण या क्वारंटाईन सेंटर मध्ये दाखल केले जातात. रविवारी दुपारच्या सुमारास इमारतीतील ९१७ रूम मधील रुग्णाने इमारतीतून उडी मारून आपले जीवन संपवले. या रुग्त्याणाचे अंदाजे वय ३५ ते ४५ असे असेल. या घटनेमुळे कोविड सेंटरच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दोन दिवसापूर्वी पनवेल कोविड सेन्टर मधील महिला बलात्कार प्रकरण ताजे असताना भिवंडीत बायपास जवळील टाटा आमंत्रन कोविड सेंटर मधून रुग्णाने उडी घेऊन आपले जीवन संपवल्या नंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

रुग्णाने एवढ्या टोकाचे पाऊल का उचलले हे पोलीस तपासा नंतर उघड होणार आहे. त्याच बरोबर हेही लक्षात येत आहे कि कोरोना झालेल्या रुग्णांना फक्त क्वारंटाईन ठेऊन, औषध उपचार करणे तर गरजेचे तर आहेच पण त्याच बरोबर त्याचे समुपदेशन करणे खूप महत्वाचे आहे.त्याला मानसिक आधार देणे हेही गरजेचे आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web