सिडको एक्जीबिशन सेंटरमधील कोव्हीड रूग्णालयात गॅस पाईपलाईनद्वारे ऑक्सिजन पुरवठा

प्रतिनिधी.

नवी मुंबई- केवळ 20 दिवसात वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटर मध्ये उभारण्यात आलेल्या 1183 बेड्स क्षमतेच्या कोव्हिड रुग्णालयामध्ये 483 ऑक्सिजन बेड्सची सुविधा करण्यात आलेली आहे. या बेड्सना तातडीची गरज म्हणून ऑक्सीजन सिलेंडरद्वारे पुरवठा केला जात होता. मात्र यामध्ये अधिक सुधारणा करीत रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा समान दाबाने मिळावा यादृष्टीने महापालिका आयुक्त श्री अण्णासाहेब मिसाळ यांच्या संकल्पनेतून याठिकाणी आॅक्सिजन पुरवठ्यासाठी पाईपलाईन बसविण्यात आली असून लिक्विड ऑक्सीजन प्लान्ट उभारला आहे. त्याचे काम जवळजवळ पूर्ण झालेले असून आज आयुक्तांनी या सर्व कामाची पाहणी केली. बुधवारपासून हा ऑक्सीजन प्लांट कार्यान्वित होऊन याव्दारे रुग्णांना अधिक चांगली सुविधा उपलब्ध होईल असा विश्वास आयुक्त श्री.अण्णासाहेब मिसाळ यांनी व्यक्त केला.सिडको एक्झिबिशन सेंटर येथील कोव्हीड रुग्णालयामध्ये 75 आणि एमजीएम हॉस्पिटल सानपाडा या ठिकाणी 75 अशा 150 आयसीयू बेड्सची सुविधा 10-15 दिवसांत उपलब्ध होणार सिडको एक्झिबिशन सेंटर येथे 75 आयसीयू बेड्सची व्यवस्था करण्यात येत असून सानपाडा येथील एमजीएम रुग्णालयातही 75 आयसीयू बेड्सची व्यवस्था करण्यात येत आहे. या दोन्ही ठिकाणी भेट देऊन आयुक्तांनी कामांची पाहणी केली. साधारणत: १० ते १५ दिवसांमध्ये 150 आयसीयू बेड्स रुग्णांसाठी उपलब्ध होतील असे आयुक्तांनी यावेळी सांगितले.सिडको एक्झिबिशन सेंटर मधील कोव्हीड रूग्णांशी आयुक्तांनी संवाद साधला. सिडको एक्झिबिशन सेंटर पाहणी दौऱ्याप्रसंगी आयुक्त श्री.अण्णासाहेब मिसाळ यांनी पब्लिक अॅड्रस सिस्टिम वरून रुग्णांशी थेट सुसंवाद साधला. यामध्ये त्यांनी त्या ठिकाणची आरोग्य तपासणी तसेच देण्यात येणाऱ्या जेवण आणि इतर सुविधांबाबत रुग्णांना विचारणा केली, तेव्हा सर्व रुग्णांनी हात उंचावून, टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला आणि महानगरपालिकेची व्यवस्था चांगली असल्याचे अभिप्राय व्यक्त केले.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web