१ जूलैला सुरू होणारे डोंबिवली क्रिडा संकुलातील कोविड रूग्णालय सुरू कधी होणार ? मनसेचा सत्ताधाऱ्यांना प्रश्न

डोंबिवली – कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहेत.आरोग्य यंत्रणा कमी पडत असून अनेक कोरीना बाधितांना बेड उपलब्ध होत नाही.परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता असताना अनेक दिवसांपासुन क्रिडा संकुलात सुरू असलेले कोविड रूग्णालयाचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे, वास्तविक ते ह्या अगोदरच सुरू होणे गरजेचे होते, परंतु सत्तेतील काही राजकीय पुढारी फक्त श्रेय लाटाण्यासाठी पहाणी दौरे करतात, पण अश्या गरजेच्या रूग्णालय लवकरात लवकर सुरू व्हावे ह्या साठी मात्र मुग गिळून गप्प बसलेले दिसतात असा आरोप मनसे उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी केला .  राजेश कदम म्हणाले, महापालिका प्रशासन आता हतबल झालेली दिसुन येते, रूग्णांना सध्या वाऱ्यावर सोडल्याचे दिसुन येते. कृपया आम्ही आयुक्तांना विनंती करतो की क्रिडा संकुलातील रूग्णालय लवकरात लवकर सुरू करावे, आपली कमजोर व तकलादु यंत्रणा रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना कुठलीही मदतीची नाही, उलट त्या यंत्रणेचा त्रासच होतो, शांतपणे ह्यावर नियोजन आखुन त्यावर अंमलबजावणी करावी तसेच ज्या रूग्णांना आॅक्सीजनची गरज असेल अश्या रूग्णांना महापालिकेने वाऱ्यावर सोडू नये. त्यांच्या रूग्णालयातील उपलब्ध बेड नुसार महापालिका/खाजगी रूग्णालयात दाखल करून त्याची व्यवस्था करावी व रूग्णाची व नातेवाईकांची फरफट थांबवावी, लवकरात लवकर तातडीने क्रिडा संकुलातील १५o साधे व ३o आयसीयु बेडची सोय असलेले कोविड रूग्णालय सुरू करावे अन्यथा मनसेला महापालिकेच्या सध्या चाललेल्या गलथान कारभाराची दखल घेवून आंदोलन करावे लागेल असा इशारा कदम यांनी दिला आहे. 

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web