कल्याण डोंबिवली मध्ये कोरोना बाधितांसाठी वॉररूम सज्ज

प्रतिनिधी .

कल्याण – कोव्हीड १९ च्या  नियंत्रणासाठी केंद्रीभूत नियोजनाच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या मुख्यालयात व इतर काही ठिकाणी वॉररुम चे नियोजन कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने  केले आहे. लवकरच कोरोना बाधित रुग्णासाठी कार्यान्वित होणार आहे. यामुळे पालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी कोव्हीड १९ चे उपचारासंबंधी मोठी मदत होईल  व होणारी परवड थांबण्यास मोठी मदत होईल यात कुठलेही दुमत नसणार आहे . 
पालिका प्रशासनाने या वॉररुममध्ये ५  नव्याने फोन कनेक्शन दिले आहेत ! त्यांचे क्रमांक नागरिकांसाठी जाहीर केले आहेत

१) ०२५१-२२११८६२

२)०२५१-२२११८६३

३ )०२५१-२२११८६४

४ ) ०२५१-२२११८६५

५) ०२५१-२२११८६६

याचप्रमाणे रुग्णवाहिकेसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून यासाठी पुढील नंबर जाहीर केले आहेत : 

१ ) ०२५१-२२११३७३
२)  ०२५१- २२०११६८
या नंबरवर फोन करून रुग्णवाहिकेची मागणी केल्यानंतर रुग्ण ज्या विभागातील आहे त्या विभागातील नागरी आरोग्य केंद्रला संपर्क साधून तिकडून रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात येणार आहे ! दरम्यान यासाठी प्रत्येक नागरी आरोग्य केंद्राला आणि रुक्मिणीबाई व शास्त्रीनगर हॉस्पिटलला प्रत्येकी ३रुग्णवाहिका दिल्या आहेत .  जवळपास ३०- ४० रुग्णवाहिका कार्यरत करण्यात आल्याची माहिती मिळत आहे  आणि  रुग्णवाहिकेत जिपीएस सिस्टिम बसवलेली आहे. 

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web