प्रतिनिधी.
डोंबिवली – कोरोनोचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून राज्यात तीन महिने लॉकडाऊन करण्यात आले. या काळात टाळेबंदी असल्याने नागरिकांच्या हाताला काम मिळत नाही. काम नाही म्हणून हातात पैसा नाही, त्यामुळे रोजच्या जीवनात आपला जीवन गाडा कसा चालवायचा हा प्रश्न त्याचा समोर उभा आहे. त्यातच मुलाच्या शाळेतील फी भरण्याचा आणखीन एक प्रश्न, त्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील शाळांनी फी लवकर लवकर भरण्यासाठी पालकांकडे मागणी करू नये. फी साठी सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाईची मागणी वंचित बहुजन आघाडीने पालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचीचे कल्याण जिल्हा संघटक मिलिंद साळवे यासह बाजीराव माने, सुरेंद्र ठोके, राजू काकडे, नंदू पाईकराव,अर्जुन केदार यांनी पालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन सदर मागणीचे निवेदन दिले.कल्याण-डोंबिवलीतील इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यमांच्या शाळांनी सध्याच्या परिस्थतीबाबत पालकांच्या आर्थिक स्थितीचा विचार करावा व फी साठी पालकान कडे तकादा लाऊ नये असे साळवे यांनी सांगितले. त्याच बरोबर लहान मुलाची प्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे प्राथमिक शिक्षण २०२०-२०२१ शाळा सुरु करू नयेत अशा विविध मागण्या वंचित बहुजन आघाडी च्या वतीने शिक्षण विभागाला निवेदन देऊन करण्यात आल्या.