अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासंदर्भात 5 जुलै 2020 पुर्वी अर्ज सादर करावे

प्रतिनिधी .

चंद्रपूर- महाराष्ट्र शासनाचे आदिवासी विकास विभागाचे शासन निर्णय क्र. आदिशी-1203,प्र.क्र.76,का.12 दि.31मार्च 2005, 11 एप्रिल 2012 व दिनांक 16 मार्च 2016 अन्वये राज्यातील अनुसूचित जमातीच्या 10 विद्यार्थ्यांना परदेशात पदवी,पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणेसाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात परदेशात शिक्षण घेणेसाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीचा लाभ मिळणेसाठी दिनांक 5 जुलै 2020 पुर्वी अर्ज मागविण्यात येत आहे.

परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज जवळच्या एकलव्य रेसिडेन्शियल स्कुल व शासकीय आश्रमशाळा संलग्न कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये व प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर येथे उपलब्ध आहेत.अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर एन.व्हि. राठोड यांनी केले आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web