प्रतिबंधित क्षेत्रामध्ये नियमानुसार कडक अंमलबजावणी करण्यात येणार – पालघर जिल्हाधिकारी

प्रतिनिधी .

पालघर – पालघर जिल्ह्यामध्ये कोविड -19 विषाणूची बाधा झालेले रुग्ण सतत वाढत असल्याचे आढळून येत असून जिल्ह्यातील या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याकरिता वेळोवेळी जाहीर करण्यात येणाऱ्या आणि जाहीर झालेल्या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये (Containment Zone) कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या अंमलबजावणी कालावधीत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले.
या बाबत व्ही. सि द्वारे आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे याच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती त्या वेळी डॉ. शिंदे बोलत होते.
या वेळी जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांचन वानेरे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सुर्यवंशी, डॉ सागर पाटील . आदि उपस्थित होते.
प्रतिबंधित क्षेत्रामध्ये नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार असून, या क्षेत्रामध्ये Active Surveillance करण्यासाठी शिक्षक, स्वयंसेवक यांची मदत घेण्यात येणार आहे.
प्रतिबंधित क्षेत्रातील हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस विभागाला NCC, NSS चे विध्यार्थी सहकार्य करणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळून इतर कोणत्याहि हालचाली या क्षेत्रात होणार नाहीत याबाबत खबरदारी घेण्यात येणार आहे. नागरिकांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखून प्रतिबंधित क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर हालचाली होणार नाहीत याची दक्षता घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनहि जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले.
लॉक डाऊन मध्ये शिथिलता आल्यामुळे नागरिकांचा संपर्क वाढला आहे. आपले दैनंदिन काम करताना प्रशासनाने ठरवून दिलेल्या उपायाचा वापर करून विषाणूचा संसंर्ग होण्यापासून स्वतःला वाचविणे शक्य आहे. ग्रामीण भागातील बहुतेक उद्योग, आस्थापना सुरु झाल्या आहेत. या सर्व ठिकाणी मास्कचा वापर, हॅण्ड वॉश स्टेशन, सॅनिटायझर, सामाजिक अंतर आणि आरोग्य सेतू या अँपचा वापर करण्यासाठी . सर्वस्तरावर जनजागृती करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी सांगितले.
खाजगी आस्थापना, उधोग, इतर व्यावसायिक, महाविद्यालय तसेच ज्या ठिकाणी गर्दी होणार आहे अशा ठिकाणी हॅन्ड वॉश स्टेशन उभारावे अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी संबंधितांना दिली. काही दिवसात शाळा सुरु होण्याची शक्यता असल्याने सर्व विद्यार्थ्यांनी सॅनिटायझर, मास्कचा वापर, सामाजिक अंतर ठेवणे या विषयी शाळांनी विध्यार्थीना प्रेरित करण्यासाठी शाळांना सूचना देण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सागितले.
पोलिस अधिक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी पोलिस विभागातील अधिकारी यांना मागदर्शन करताना सांगितले पोलिस झोन निश्चित करताना प्रत्येक क्वॉरंईन होमला पुरसे मनुष्यबळ देण्यात यावे दररोज काराटईन होमचा अहवाल अपडेट ठेऊन मुख्यालयात वेळेत पाठवावा. सतत कोव्हिड 19 चा प्रसार वाढत असल्याने पेालिसांनी सुध्दा आपली काळजी घेताना मास्क वापरावे, सॅनिटायझर चा वापर करावा, तसेच सामाजिक अंतर ठेवावे. अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web