चंद्रपूर जिल्हात टेलिफोनिक कौन्सिलिंग सुरू होणार मानसिक समस्यांसंदर्भात केल्या जाणार समुपदेशन

प्रतिनिधी .

चंद्रपूर – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जनजागृती संदर्भात आत्मभान अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहे. नागरिकांना कोरोनाच्या काळामध्ये मानसिक दडपण येऊ नये तसेच ताणतणाव अशा परिस्थितीतून कसे बाहेर पडता येईल याविषयीची माहिती, समस्यांचे निराकरण, नागरिकांना मानसिक आधार देण्यासाठी आत्मभान अभियानांतर्गत जिल्ह्यात लवकरच टेलिफोनिक कौन्सिलिंग सुरू होणार आहे. यासंबंधीचे प्रशिक्षण विषयक कार्यशाळा अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 25 जूनला पार पडली. या टेलिफोनिक कौन्सिलिंग संदर्भातील लवकरच हेल्पलाईन क्रमांक जारी केल्या जाणार आहे.

या हेल्पलाइन क्रमांकाद्वारे टेलीफोनिक कौन्सिलिंगसाठी सुशिलाबाई रामचंद्रराव मामिडवार समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी- विद्यार्थ्यांची चमू काम करणार आहे. या प्रशिक्षण कार्यशाळेत मानसिक रोग तज्ञ डॉ. किरण देशपांडे, सुशिलाबाई रामचंद्रराव मामिडवार समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापिका डॉ.जयश्री कापसे, प्राध्यापक डॉ. देवेंद्र बोरकुटे, महाविद्यालयाचे 19 विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच पूजा द्विवेदी, रश्मी बाबेरवाल,मृणाल भोयर प्रामुख्याने उपस्थित होते.

अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी मार्गदर्शनात, नागरिकांच्या मानसिक समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनांतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या टेलिफोनिक कौन्सिलिंग हेल्पलाइन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे. नागरिकांमध्ये कोरोना विषयक भीती आहे. या सर्व परिस्थितीमध्ये नागरिकांना मानसिक आधार देणे गरजेचे आहे.याविषयीची सविस्तर माहिती समुपदेशकाला असणे गरजेचे आहे.

दरम्यान, नागरिकांशी संवाद साधतांना आपुलकीपुर्वक बोलणे गरजेचे आहे.त्याचप्रमाणे, अनेक नागरिक सामाजिक, आर्थिक, इतरही प्रश्न विषयक अडचण दूर करण्यासाठी बोलतील. परंतु या सर्व प्रश्नांना योग्य ती उत्तर देणे गरजेचे आहे.नागरिकांना आश्वासक आधार देणारा संपर्क असावा. असेही यावेळी उपस्थितांना संबोधित केले.

मानसिक रोग तज्ञ डॉ.किरण देशपांडे यांनी समुपदेशन विषयीचे सविस्तर मार्गदर्शन केले. सध्याच्या कोरोनाच्या काळामध्ये लहान बालके, वयोवृद्ध, गर्भवती महिला तसेच इतरही आजार असणारे नागरिक घरामध्येच आहे. या नागरिकांना मानसिक आधार देणे गरजेचे आहे. कौटुंबिक ताणतणाव काही प्रमाणात वाढलेला दिसतो तसेच शारीरिक परिणाम सुद्धा दिसून येत आहे. नागरिकांच्या मनामधील कोरोना विषयी असणारी भीती कमी करण्यासाठी समुपदेशन महत्त्वाची भूमिका बजावत असते.

यावेळी सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापिका डॉ.जयश्री कापसे यांनी विद्यार्थी-विद्यार्थिनींना समुपदेशन करताना येणाऱ्या अडचणी याविषयीची माहिती दिली. या काळामध्ये नागरिकांमध्ये असणारी ताणतणावाची परिस्थितीवर उत्तर शोधणे गरजेचे आहे. नागरिकांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतः उत्तर शोधण्यासाठी समुपदेशन प्रेरित करीत असते.जिल्ह्यात प्रथमता मानसिक आरोग्याची हेल्पलाइन अर्थात टेलिफोनिक कौन्सिलिंग जिल्हा प्रशासन अंतर्गत सुरू होणार आहे. यासंदर्भात लवकरच हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात येणार असून याविषयीचे हेल्पलाइन कळविण्यात येणार आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web