वंचित बहुजन आघाडीतर्फे केडीएमसी आयुक्त कार्यालयाला निवेदन,रुग्णाची हेळसांड थांबवा

प्रतिनिधी.

कल्याण – कल्याण डोंबिवली – महापालिका क्षेत्रातमध्ये कोरोनाच्या भयंकर परिस्थितीमध्ये अपुऱ्या आरोग्याच्या गैरसोयीमुळे सामान्य व्यक्तीचे‌ आतोनात हाल होत आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी कल्याण मधील रुक्मिणीबाई रुग्णालयात रुग्णांना बेड व वेन्टीलेटर नसल्याने रुग्णांचा मृत्यू झाला होता त्या संदर्भात जाब विचारण्यासाठी मंगळवारी ता.२३ रोजी निवेदन देण्यात आले . तसेच त्याबरोबर पक्षाच्या वतीने अनेक सामान्य जनतेच्या आरोग्याच्या संबंधित मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने. कल्याण मधील लाखांच्या संख्येने लोकसंख्या असलेल्या शहरांमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात त्वरीत वेन्टीलेटर‌ व मोठ्या प्रमाणात बेड ची सुविधा उपलब्ध करण्यात यावी.कोविड संशयित रुग्णाकरिता खाजगी रुग्णालयात isolation ward करण्यात यावे.कल्याण पूर्व मध्ये quarantine center ची सुविधा उपलब्ध करण्यात यावी. कोविड १९ चा रिपोर्ट साठी ज्यादा लॅब असावी. महापालिका क्षेत्रात असलेल्या झोपडपट्ट्या मध्ये अति उपाययोजना राबविण्यात यावी.

क.डो.म.पा. अंतर्गत असणाऱ्या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात वैद्यकीय कर्मचारी व रुग्णवाहिका ची संख्या त्वरीत वाढविण्यात यावी.तसेच महापालिका क्षेत्रात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोविड रुग्णांची संख्यावर नागरिकांना त्रास न होता यांवर त्वरीत उपाययोजना करावी
वरील अशा अनेक प्रमुख मागण्यांसाठी संबंधित अधिकारी याना वंचित बहुजन आघाडी च्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदन देताना प्रामुख्याने वंचित बहुजन महिला आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्ष मायाताई कांबळे तसेच महिला पदाधिकारी व शिवाजी नगर वालधुनी मधील वंचितचे कार्यकर्ते व इतर पदाधिकारी तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web