आर्वीचे वीर जवान अक्षय यादव यांच्या कुटुंबाची गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली भेट

प्रतिनिधी.

सातारा – सातारा जिल्ह्यातील कोरेगांव तालुक्यातील आर्वी येथील वीर जवान अक्षय यादव यांचे मणिपू्र येथे निधन झाले होते. त्यांच्यावर काल त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज आर्वी येथे वीर जवान अक्षय यांच्या आई छाया यादव यांची भेट घेऊन त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले.
यावेळी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी यादव कुटुंबाला राज्य शासनाच्या वतीने सर्वातोपरी मदत करण्यात येणार असून श्रीमती छाया यादव यांच्या घराबाबतचा निर्णय लवकर घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कोरेगावचे आमदार महेश शिंदे, शिवसेना उपनेते प्रा.नितीन बानुगडे पाटील, कोरेगावच्या प्रातांधिकारी किर्ती नलवडे, कोरेगावच्या तहसिलदार रोहिणी शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी बी.बी महामुनी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कमांडर विजयकुमार पाटील, जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील, आर्वीच्या सरपंच सविता राऊत, माजी पंचायत समिती सदस्य विकास राऊत विस्ताराधिकारी सपना जाधव उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web