बेरोजगारांना सुवर्णसंधी ऑनलाईन रोजगार मेळावा

प्रतिनिधी.

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने ‘ऑनलाईन व्हर्च्युअल जॉब फेअर’ 29 जून ते 1 जुलै पर्यंत आयोजित केले आहे.
यामध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह, बँकऑफिस, सेल्स ऑफिसर, डाटा ऑपरेटर, विमा सल्लागार, एजन्सी मॅनेजर, टेलीकॉलर, फिल्ड सेल्स ऑफिसर, आयटीआय सर्व ट्रेड, डिप्लोमा, मॅकॅनिकल/इलेक्ट्रीशयन इंजिनिअर, सीएनसी, व्हीएमसी, फौन्ड्री, हेल्पर यासाठी 8 वी ते पदवीधर, पदव्युत्तर, आयटीआय, डिप्लोमा, बी.ई.मॅकॅनिकल/ईॲन्डटीसी/इलेक्ट्रीकल अशा शैक्षणिक पात्रतेची कोल्हापूर जिल्ह्यातील नामांकित 10 आस्थापनांची 441 विविध रिक्तपदांद्वारे मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
इच्छुक व ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार व उद्योजकांच्या सोईनुसार दिनांक 29 जून 2020 ते 1 जुलै 2020 त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएम अलर्ट द्वारे कळविण्यात येईल व शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतींचे आयोजन करण्यात येईल.
उमेदवारांनी आपापल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे या विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर लॉगीन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उचित असलेल्या रिक्तपदासाठी आपला पसंतीक्रम व उत्सुकता ऑनलाईन पध्दतीने नोंदवावा. आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करून पदाची निवड करण्याची दक्षता घ्यावी, जेणेकरून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने विहित केलेल्या अटी व शर्तीचे पालन करणे व संधीचा लाभ घेणे उद्योजक व उमेदवार यांना सहज शक्य होईल.
कोल्हापूर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांना आवाहन करण्यात येते की, दिनांक 29 जून 2020 पर्यंत आपले पसंतीक्रम नोंदवून रोजगार मेळावा संधीचा लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी 0231-2545677 या दुरूध्वनी क्रमांवार संपर्क साधावा, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त ज.बा.करीम यांनी केले आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web