कोकण भवनात रक्तदान शिबिराचे आयोजन

प्रतिनिधी.

नवी मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे यांच्या सूचनेनुसार आज दि. 23 जून रोजी कोकण भवन येथील पहिल्या मजल्यावर असलेल्या कोविड-19 विभागीय समन्वय कक्षामध्ये महसूल विभागाच्या पुढाकाराने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कोकण भवनमधील अधिकारी, कर्मचारी यांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले. विशेष म्हणजे महिला अधिकारी कर्मचारी यांचा सहभाग लक्षणीय असा होता. महसूल विभाग गेले तीन महिने कोरोनासाठी अहोरात्र काम करीत आहे.
करोना व्हायरसविरुद्ध असलेले युद्ध जिंकण्यासाठी विविध पद्धतीने लढले जात आहे. या युध्दात प्रत्येक क्षेत्रातील योध्दे आपली भूमिका ओळखून ती चोख बजावत आहेत. या लढाईत शासकीय कर्मचारी हे सुरुवातीपासूनच सगळयात पुढे आहेत. हे आज दिसून आल्याचे उपायुक्त (महसूल) श्री. सिध्दाराम सालीमठ यांनी यावेळी सांगितले.
कोकण भवन मधील पहिल्या मजल्यावर असलेल्या दालनात या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबीर आयोजित करताना आयोजकांनी सोशल डिस्टंसिंगसह मास्क आणि सॅनिटाईझरचा योग्य वापर केला. सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी सर्वश्री. मनोज रानडे, उपायुक्त (सामान्य), श्गिरिष भालेराव, उपायुक्त (विकास), मनोज गोहाड,उपजिल्हाधिकारी मुंबई, बापूसाहेब सबनीस, उपायुक्त (नियोजन) आणि विभागीय महिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कोकण भवनचे वैद्यकीय अधिकारी तथा विभागीय नियंत्रक कोविड-१९ डॉ. गणेश धुमाळ आणि डॉ. बालाजी फाळके यांनी सदर शिबीरासाठी विशेष सहकार्य केले. नवी मुंबई महानगरपालिका यांच्या रक्तपेढीने सदर उपक्रमास उस्त्फुर्त प्रतीसाद दिला. यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेच्या रक्त संक्रमण अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web