पावसाळी पर्यटनस्थळी प्रतिबंधात्मक आदेश लागु

प्रतिनिधी.

ठाणे – ठाणे जिल्हयातील ज्या धबधबे, तलाव किंवा धरणांच्या ठिकाणी पर्यटक मोठया प्रमाणात येतात.अशा ठिकाणी सामाजिक अंतर पाळणे शक्य नसून कोरोना विषाणूचा संसर्ग होवून प्रसार होण्याची दाट शक्यता निर्माण होते. तसेच पर्यटकांची सुरक्षा अबाधित रहावी व कोणत्याही प्रकारची जिवीतहानी होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी यासर्व ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे.

ठाणे जिल्हयामध्ये मान्सुन कालावधीत मोठया संख्येने पर्यटक धबधबे, तलाव तसेच धरणांच्या ठिकाणी येत असतात त्या ठिकाणी जिवितहानी होण्याच्या घटना घडल्या आहेत.
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार तसेच साथरोग नियंत्रण कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 34 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन ठाणे जिल्हयातील तालुका निहाय स्थळांना प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे.
येऊर येथील धबधबे, सर्व तलाव, कळवा मुंब्रा रेतीबंदर सिध्दगड डोंगरनाव्हे, सोनाळे गणपती लेणी, हरिश्चंद्रगड,बारवीधरण परिसर भातसा धरण स्थळ, कुंडन, दहीगाव, माहुली किल्ल्याचा पायथा
मुंब्रा बायपास येथील सर्व धबधबे, गायमुख रेतीबंदर पडाळे डॅम, माळशेत घाटातील सर्व धबधबे, पळु चेरवली, अशोक धबधबा, खरोड, आजा पर्वत (डोळखांब), सापगांव नदी किनारी, कळंबे नदी किनारा,
घोडबंदर रेतीबंदर, उत्तन सागरी किनारा खोपवली, गोरखगड, सिंगापुर नानेघाट, धसई डॅम, आंबेटेबे मुरबाड कसारा येथील सर्व धबधबे,कांबा पावशेपाडा, खडवली नदी परिसर, टिटवाळा नदी परिसर, गणेश घाट चौपाटी नदीनाका, गणेशपुरी नदी परिसर कोंडेश्वर, धामणवाडी, तारवाडी, भोज, वऱ्हाडे, दहिवली, मळीचीवाडी यांचा समावेश आहे.

धबधबे, तलाव किंवा धरणे या ठिकाणांच्या सभोवताली 1 किलोमीटर परीसरात दि.19जून पासुन ते पुढील आदेश होईपर्यंत खालील बाबींकरीता प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे.धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे.पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे इ. ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे.पावसामुळे निमार्ण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्यवाहतुक करणे, अनाधिकृत मद्य विक्री करणे व उघडयावर मद्य सेवन करणे.वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे.वाहनांची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे.सार्वजनिक ठिकाणी खादयपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या व थरमाकॉलचे व प्लास्टिकचे साहित्य उघडयावर व इतरत्र फेकणे.
सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगल टवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य अश्लिश हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे. सार्वजनिक ठिकाणी मोठया आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे, ङिजे. सिस्टम वाजविणे, गाडीमधील स्पिकर/उफर वाजविणे व त्यामुळे ध्वनीप्रदुषण करणे.
ज्या कृतीमुळे ध्वनी, वायु व जल प्रदुषण होईल अशी कोणतीही कृती करणे. धबधब्याच्या 1 किलोमीटर परिसरात सर्व दुचाकी, चारचाकी व सहा चाकी वाहनांना प्रवेश करणेस मनाई करणेत येत आहे. (अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून)
तरी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web