झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी वंचितचे राज्यभर आंदोलन,हे सरकार जातीय व धर्मवादी – प्रकाश आंबेडकर

अकोला, – राज्यात मागासवर्गीयांवरील हल्ल्यात प्रचंड वाढ झाली असून तपास यंत्रणा कुचकामी ठरल्या आहेत. कोणत्याही प्रकारची…

एसटीच्या मासिक,त्रैमासिक पासला मुदतवाढ – परिवहनमंत्री अनिल परब

मुंबई, – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या टाळेबंदीमध्ये एसटीची वाहतूक राज्यभर पूर्णत: थांबवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ज्या प्रवाशांनी आपले मासिक,त्रैमासिक पास काढले असतील, परंतु त्यांना टाळेबंदीमुळे प्रवास करणे शक्य झाले नसेल. अशा प्रवाशांना त्यांच्या मासिक, त्रैमासिक पाससाठी मुदतवाढ देण्यात येत आहे,  ज्यांना या मासिक, त्रैमासिक पासचा परतावा पाहिजे असेल त्यांना देखील तो परतावा देण्याची व्यवस्था एसटी महामंडळाने केली आहे,अशी माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड.अनिल परब यांनी दिली  दि.२२ मार्च २०२० पासून करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी लागू करण्यात आली होती.परिणामस्वरूप २२मार्चपूर्वीएसटीने प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी मासिक, त्रेमासिक पास काढले होते परंतू एसटी बंद असल्याने त्यांना या काळात प्रवास करणे शक्य झाले नाही .अशा प्रवाशांच्या मासिक, त्रैमासिक पासला सध्या मुदतवाढ देण्यात येत आहे. ज्यांना आपला पास रद्द करून, उर्वरित रकमेचा परतावा हवा असेल, त्यांना देखील तो परतावा देण्याची सुविधा एसटी प्रशासनाने दिली आहे. त्यासाठी संबंधित प्रवाशांनी जवळच्या आगारात जाऊन आगार प्रमुखांच्या नावे विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांना, त्यांच्या मासिक,त्रैमासिक पासला मुदतवाढ अथवा त्यांच्या पासचा उर्वरित परतावा रक्कम देण्याची व्यवस्था आगार पातळीवर करण्यात येईल, असेही परिवहनमंत्री श्री. परब यांनी संगितले.

उपलब्ध रोजगारामध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य द्या व परप्रांतात गेलेल्या मजुरांची वैद्यकीय तपासणी करूनच राज्यात घ्या – मनसे आमदार राजू पाटील

प्रतिनिधी . कल्याण :  सत्तेतील काही खासदार परप्रांतीयांचे लांगुलचालन करून जाणीवपूर्वक भूमिपुत्रांचे खच्चीकरण करीत असल्याचा आरोप…

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web